स्थानिक: पोलीस महानिरीक्षक अमरावती ग्रामीण परिक्षेत्र यांच्या तर्फे उत्कृष्ट तपास करून सदर आरोपीस आजन्म करावासाची शिक्षा झाल्याबाबत प्रशस्तीपत्र देवून पोलीस उपनिरीक्षक संजीवनी पुंडगे पोलीस स्टेशन रामदास पेठ अकोला यांचा सन्मान करण्यात आला.
त्यांच्या या कार्याबद्दल सगळीकडून त्यांचे कौतुक केले जात आहे. ही बाब सर्वांसाठी अभिमानाची बाब असून त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव व्हावा या उद्देशाने त्यांचा प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात आला. समाजाच्या विविध स्तरावरुन पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा देखील देण्यात येत आहे.