
अकोला दिनांक -स्थानिक अकोला येथील सनराइज सोशल वर्क ग्रुप तर्फे मलकापूर येथील कर्ण व मूकबधिर मुलींच्या शाळेत होळी व रंगपंचमी साजरी करण्यात आली.त्यानिमित्य विद्यार्थ्यांना फराळाचे वाटप करण्यात आले. तसेच त्यांना आईस्क्रीम देऊन त्यांचा आनंद द्विगुणित करण्यात आला. अकोला येथील सनराइज सोशल वर्क ग्रुप हा अकोल्यातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारा ग्रुप असून ज्या ज्या ठिकाणी समाजाला गरज आहे तसेच अंध विद्यालय, मूकबधिर विद्यालय, वृद्धाश्रम, जिल्हा रुग्णालय व महिला जिल्हा रूग्णालय येथे फराळ व जेवणाचे वाटप करीत असतात.
या ग्रुपचे संचालक संस्थापक श्री नितीन देव व सौ. श्रद्धा देव करीत असून नेहमी दिन दुबळ्या व गरजू लोकांना सहकार्य करतात. या ग्रुपमध्ये सपत्नीक श्री प्रभाकरराव भेलके, श्री किशोर मांडेकर,श्री किशोर विभुते, श्री पाटील, श्री मोरे,प्रा. विवेक हिवरे, श्री गजानन कुलकर्णी, श्री सुभाष पाटील, श्री श्रीकृष्ण ईधोड,केतन गांधी इत्यादी कार्य करीत आहेत. या कार्यक्रमाला शाळेच्या अधीक्षक श्रीमती पान्हा राठोड व सुषमा गोतरकर व सर्व कर्मचारी यांनी सहकार्य केले.