भारतीय विद्यार्थी मोर्चा या सामाजिक संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष हर्षपाल यशवंत पाटील यांचा आज साक्षगंध झाला त्यानिमित्त त्यांनी बामसेफ प्रणित भारतीय विद्यार्थी मोर्चा या संघटनेला साधनसंसाधन निर्माण करण्याकरता एक हजार रुपये जनआंदोलन निधी दिला.
या भारतामध्ये मूळनिवासी महापुरुषांनी विचार प्रस्थापित केले आणि आमच्या स्वातंत्र्याचे आंदोलन चालविले त्यांच्या या आंदोलनामुळे आम्हाला मान सन्मान आणि स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार मिळाला तेच आंदोलन आज वर्तमानामध्ये या देशांमध्ये बामसेफ चालवत आहे कुठलही आंदोलन चालवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी साधनसंसाधनांची आवश्यकता असते आणि साधन संसाधनांची निर्मिती करण्यासाठी पैशाची आवश्यकता असते या देशामध्ये आधी जेवढेही विधी व्हायचे त्याचा सर्वच्या सर्व निधी ब्राह्मणांना जायचा आणि ब्राह्मण त्या निधीच्या आधारावर त्यांची व्यवस्था मजबूत करायचे पण आज बामसेफच्या जागृतीमुळे सर्व लोक कुठलाही विधी पार पाडण्याआधी आधी निधी आणि नंतरच विधी असा संकल्प करून महापुरुषांचे जे आंदोलन आहे हे आंदोलन बामसेफने पुढे नेण्याकरिता बामसेफला निधी देत आहेत तर हाच संकल्प करून भारतीय विद्यार्थी मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष हर्षपाल पाटील यांनी आपल्या साक्षगंध निमित्त एक हजार रुपये जनआंदोलन निधी कार्यकर्त्यांकडे सुपूर्द केला.
हर्षपाल पाटील यांना साक्षगंधा निमित्त खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीकरिता त्यांना खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक भारतीय विद्यार्थी मोर्चा अकोला जिल्हा.
मा.संदेश कांबळे (प्रदेश अध्यक्ष IRSA
प्रशिक मेश्राम (जिल्हाध्यक्ष भारतीय युवा मोर्चा)
भूषण मेश्राम (जिल्हा संयोजक भारतीय विद्यार्थी मोर्चा)
अतुल वानखडे (भारतीय विद्यार्थी मोर्चा)
भूषण डोंगरदिवे (भारतीय विद्यार्थी मोर्चा)
कपिल गवई (भारतीय बेरोजगार मोर्चा)
इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते