हरविलेले मोबाईल परत करणे अभियान

अकोला:मा. श्री बच्चनसिह, पोलीस अधिक्षक साहेब, जिल्हा अकोला, मा. अभय डोंगरे अपर पोलीस अधिक्षक साहेब जिल्हा अकोला यांचे मार्गदर्शनात नागरीक प्राथमीक पोलीसींग अभियान राबवुन पोलीस स्टेशन अकोट शहर ११ मोबाईल, अकोट ग्रामीण ०९ मोबाईल, तेल्हारा ०८ मोबाईल,, हिवरखेड ०३ मोबाईल, दहिहांडा ०५ मोबाईल असा एकुण ३६ मोबाईल चा शोध घेवुन ४,९३,९०० रूपयाचा मुद्देमाल हस्तगत करून मोबाईल धारकांना बोलावुन पोलीस स्टेशन अकोट शहर येथे सावली सभागृह ला हरविलेले मोबाईल परत करण्याचा कार्याक्रम घेण्यात आला असुन सदर कार्याक्रमामधे श्री अनमोल मित्तल सहा. पोलीस अधिक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी अकोट, अमोल माळवे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन अकोट शहर, किशोर जुनघरे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन अकोट ग्रामीण यांचे हस्ते मोबाईल धारकांना मोबाईल परत करण्यात आले. हजर असलेल्या ३६ मोबाईल धारकांनी हरविलेला मोबाईल परत मिळाल्याचा आनंद व्यक्त करून पोलीस विभागाचे आभार मानले. सदर कार्यक्रमा करीता गणेश पाचपोर पोउपनिरीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय अकोट, पोलीस अंमलदार नंदकिशोर कुलट, प्रदीप राउत, गोपाल जाधव, प्रमोद चव्हाण, योगेश उमक, रामेश्वर भगत, अनिल सिरसाट, गणेश धुर्वे यांनी अथक परिश्रम घेतले. अनमोल मित्तल सहा. पोलीस अधिक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी अकोट, यांनी जनतेला असे ही आवाहन केले की, महीलांवर होते असलेल्या अत्याचारा बाबत सक्षम कार्यक्रम राबवित असुन कोणालाही काही अडचण असल्यास डायल ११२ चा वापर करावा.

Leave a Reply

Your email address will not be published.