वंचित बहुजन युवा आघाडीचे वतीने रोहित पायल आणि सोमनाथ हयांना अभिवादन..

अकोला : दि. १७

P. hD. स्कॉलर रोहित वेमूला यांच्या स्मृतिदिनी त्यांच्या संघर्षाला उजाळा देत रोहित वैमला, पायल तडवी आणि सोमनाथ सूर्यवंशी ह्यांना वंचित बहुजन युवा आघाडीचे वतीनेअभिवादन करण्यात आले. स्थानिक सर्किट हाऊस येथे आयोजित अभिवादन सभेत रोहीत, पायल ह्या विद्यार्थ्यांना मानसिक तणावातून मृत्युंपर्यंत पोहोचवणाऱ्या व्यवस्थेने त्यांचे बळी घेतले आहे .रोहित पासून सुरवात होऊनपायल तडवी नंतर सोमनाथ सूर्यवंशी हा बळी ठरला असून रोहित वेमूला ॲक्ट यांच्या नावाने विद्यार्थ्यांना होणाऱ्या पिळवणुकी विरोधात कायदा व्हावा ह्या साठी रोहित ची आई कुटुंब आणि बाळासाहेब आंबेडकर ह्यांनी आंदोलन केले.मात्र सरकारने दखल घेतली नाही.जो पर्यंत हा ॲक्ट होत नाही, वंचित बहुजन आघाडी थांबणार नाही असे युवा आघाडी प्रदेश महासचिव यांनी प्रतिपादन केले.

रोहित पायल ह्यांची संस्थेने व जातीय प्रवृत्तीने बळी घेतला.तर मुंबईत वसतिगृहात शिकणाऱ्या मेश्राम नावाच्या तरुणीची हत्या होणे, सोमनाथ सूर्यवंशी ह्याचा पोलीस कोठडी मध्ये खून भयावह आहे.ह्या विरुद्ध तातडीने आणि कठोर कार्यवाही होत नाही. उलट फडणविस सभागृहात खोटी माहिती देतात तर तेलंगणा मद्ये काँग्रेस सरकारने भाजप पदाधिकारी ह्यांना वाचविण्या साठी क्लीन चिट देत रोहित ची केस बंद करून क्लोजर रिपोर्ट पाठविला आहे.एकीकडे राहुल गांधी संविधान आणि अनुसुचित जाती जमाती बाबत नाटकी आंदोलने करतात तर त्यांच्याच पक्षाचे सरकार पोलिसांच्या माध्यमातून क्लोजर रिपोर्ट सादर करते.सरकार कुणाचेही असेल तरी अनुसुचित जाती जमाती भटके विमुक्त आणि अल्पसंख्यक, ओबीसी विद्यार्थी सुरक्षित नाही.

यावेळी युवा आघाडी जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे,महासचिव राजकुमार दामोदर,महानगर अध्यक्ष वैभव खडसे,रितेश यादव,सचिन शिराळे,आकाश गवई,सुरज दामोदर,राजेश बोदडे,आशिष सोनोने,सचिन डोंगरे,अमोल शिरसाट,पायल कांबळे,नंदिनी ढोले,निखिल गजभिये,राज सावळे, तन्मय कांबळे,यश तुरेराव,नागेश उमाळे, निकी डोंगरे, सुगत डोंगरे, ऍड सुगत डोंगरे,आकाश जंजाळ, पराग गवई आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.