सम्राट अशोक प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. संतोष बनसोड यांचा कृतज्ञता सत्कार समारंभ संपन्न..


स्थानिक: संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ सिनेट सदस्य डॉ संतोष बनसोड यांचा कृतज्ञता समारंभ तसेच सत्कार समारंभ अकोला येथे जिजाऊ सभागृह या ठिकाणी पार पडला.
खुल्या प्रवर्गातून प्रचंड मतांनी डॉ संतोष बनसोड यांचा सिनेट निवडणुकीत विजय झाला त्यानिमित्त प्राध्यापक संशोधक,पुरोगामी संघटना व सम्राट अशोक प्रतिष्ठान चे वतीने हा समारंभ आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आंबेडकरी चळवळीचे प्रख्यात वक्ते डाटा संघटनेचे विभागीय सचिव प्रा डॉ एम आर इंगळे , स्वागताध्यक्ष म्हणून ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत प्रा डॉ विलास तायडे तर डाटा जिल्हाध्यक्ष प्रा डॉ प्रसेंनजित गवई ,समाजशास्त्र अभ्यास मंडळ सदस्य डॉ बी एच कीर्दक , डॉ गणेश बोरकर , डॉ कैलास नागुलकर डॉ देवलाल आठवले ,प्रा डॉ अशोक इंगळे ,प्रा डॉ अनिल वानखेडे, प्रा डॉ बाळकृष्ण खंडारे या मान्यवरांची उपस्थिती होती.


डॉ संतोष बनसोड यांनी आपल्या मनोगतात सर्वांचे आभार व्यक्त करत निवडणुकीतील गांभीर्य लक्षात आणून दिले. तर डॉ एम आर इंगळे यांनी अध्यक्षीय भाषणात कर्तृत्ववान व्यक्तीला कुणीच थाबवू शकत नाही याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉ बनसोड आहेत असे प्रतिपादन केले. सोबत डाटा संघटनेची भूमिका विषद करून भविष्यात डाटा ही संघटना एकमेव पर्याय म्हणून पुढे येईल हा आशावाद व्यक्त केला. डॉ विलास तायडे,प्रा.डॉ प्रसेंनजीत गवई, कैलास नागुलकर , डॉ गणेश बोरकर इत्यादी मान्यवरांच्या मनोगतातून डॉ संतोष बनसोड यांचा ऐतिहासिक विजय चळवळीला बळ प्रदान करणारा ठरला.

आजचा कृतज्ञता सत्कार समारंभ चळवळीला वैचारिक दिशा देणारा सिद्ध झाला ही भावना व्यक्त करण्यात आली. याप्रसंगी सम्राट अशोक प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रा विजय आठवले यांनी संचालन तर प्रास्ताविक डॉ संदीप डोंगरे यांनी आभाप्रदर्शन डॉ अशोक इंगळे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा डॉ सुरेश पंडित , डॉ प्रसन्न बगडे, प्रा डॉ राहुल घुगे, प्राचार्य पदमानंद तायडे, प्राचार्य डॉ संतोष पेठे, प्रा सुनील कांबळे, निरंजन वाकोडे,विद्याधर मोहोड, डॉ संतोष मिसाळ, डॉ धीरज नजान, डॉ गणेश पोटे, मंदाताई शिरसाट, कल्पना खंडारे, अजय वानखेडे इत्यदिनी परिश्रम घेतले. याप्रसंगी प्राध्यापक, संशोधक,विचारवंतांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published.