१ ले राज्यस्तरीय राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलन, अमरावती येथे भव्य आयोजन

मुख्य मार्गदर्शक आचार्य हरिभाऊजी वेरूळकर राहणार

अमरावती:

मानवतेचे महान पुजारी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी यांच्या ५४ व्या पुण्यस्मरण निमित्त अमरावती येथील अभियंता भवन येथे आगामी दि ,४ व ५ फेब्रुवारी २०२३ दरम्यान सेवा फाऊंडेशन व राष्ट्रधर्म युवा मंच अमरावती जिल्हा द्वारा पहिले राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी विचार साहित्य संमेलन अ,भा ,श्रीगुरूदेव सेवा मंडळाचे आजीवन प्रचारक श्रध्येय आचार्य हरिभाऊ वेरूळकर गुरुजी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहे. राष्ट्रसंतांच्या प्रचार व प्रसार समाजातील युवक ,युवती व शेवटच्या घटका पर्यंत व्हावा हाच मुख्य हेतू या राज्यस्तरीय संमेलनाचा राहणार आहे. हे राज्यस्तरीय संमेलन शिस्तबद्ध व सुरळीत पार पडावे यासाठी संमेलन आयोजना मध्ये मार्गदर्शन समिती, आयोजन समिती ,व्यवस्था समिती, भोजन समिती,स्वच्छता व शिस्तता समिती, सामुदायिक ध्यान प्रार्थना समिती, कार्यवाहक समिती, पाणी व वाहन स्थळ समिती अशा विविध समित्यांचे गठन लवकरच होणार असून , आचार्य वेरूळकर गुरुजी यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकत्याच संपन्न झालेल्या एका महत्वपूर्ण बैठकीत आयोजन समिती मध्ये नवतरुणांना संधी देण्याचे ठरले आहे.

या अनुषंगाने राष्ट्रधर्म युवा मंचचे केंद्रीय प्रवक्ते श्री अंकुश मानकर यांची आयोजन समितीच्या अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर उपाध्यक्ष श्री बाळासाहेब गोमासे व अर्जुनदास सनके, सचिव श्री श्रीकृष्ण बैलमारे, सहसचिव श्री प्रवीण मोहोड, कोषाध्यक्ष चि. मयुर वानखडे व सदस्य पदी श्री प्रसाद बरगट, अशा प्रकारे कार्यकारिणी राहील. या संमेलनाचे प्रमुख मार्गदर्शक आचार्य हरिभाऊजी वेरूळकर गुरूजी, डाॅ. नरेंद्र तराळ, डॉ. रामेश्वर बरगट, ह.भ.प. नामदेव महाराज गव्हाळे, श्री. दिनकर चोरे हे राहतील.

आयोजन समितीच्या वतीने लवकरच इतर समित्या गठीत करून घोषित केल्या जातील. तसेच राज्यस्तरीय संमेलनाच्या भव्य आयोजन मध्ये अमरावती जिल्ह्या बरोबरच बाहेर जिल्हयातुन सुध्दा संत साहित्यिक, लेखक,कवी,समीक्षक, पत्रकार, व्याख्याते, प्रवचनकार,तत्त्वचिंतक मान्यवरांना निमंत्रित करण्यात येणार आहे. करीता श्रीगुरूदेव प्रेमी व सर्व समविचारी अभ्यासक मंडळींनी यशस्वीते करीता सहकार्य करावे. अशी नम्र विनंती आयोजन समिती आणि मार्गदर्शक डॉ.नरेंद्र तराळे, डॉ. रामेश्वर बरगट, ह.भ.प. गव्हाळे महाराज, श्री. दिनकर चोरे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.