
आकाश भाऊ डोंगरे मित्र परिवारातर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
स्थानिक : अकोला
या वर्षी सुद्धा आकाश भाऊ मित्र परिवार तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान देईल जीवनदान, युवकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्यांना मिळाला, युवा दिनानिमित्त व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त निमित्त 65 रक्तदातांनी दिली आगळी वेगळी आदरांजली. सर्व येणाऱ्या रक्तदात्याला नाष्टा, केळी, चाय, आणि पाणी यांची उत्तम व्यवस्था केली होती. सोबत एक मेडिकल टीम हजर होती. आकाश भाऊ यांनी सर्व रक्तदात्यांचे मनापासून खूप खूप आभार देखील व्यक्त केले.

यावेळी, बजरंगभाऊ नागे, भय्यूजी पाटील, सनी भाऊ मुद्रंगे, नितीन भाऊ सपकाळ, सुरजभाऊ मकोरिया,सोनू यादव,गौतम सुर्वे, दिनेश खंडारे,अक्षय तायडे, जयदेव भाकरे,सोनू नेवारे,सुमित रक्षक,लखन वाघमारे, आकाश यादव,यांनी कथक परिश्रम घेतले.
सुरज करमरकर सर, सुशील रामटेके, मनोज तेलगोटे, गौरव खंडार, शेख शोएब, अक्षय जाधव,सौरभ नीलखंड, प्रदीप काशीद, वैभव आयवळे सोबतच साई जीवन ब्लॅंड बँक चे त्यांना सहकार्य लाभले...