
अकोला – बाळापूर येथिल सायन कॉलनी शेळद अकोला नाका येथे विद्युत खांब असून सुद्धा आतापर्यंत ग्रामपंचायत शेळद यांनी लाईट लावण्यात आले नाही. ग्रामपचायतच्या या गलथान कारभारामुळे नागरिकांना खुप त्रास सहन करावा लागत आहे. ही कॉलनी धरणाच्या जवळच असून पाणी पिण्यासाठी काही रानटी घातक जाणवारे चिता व काही झेरली साप यासारखे प्राणी पाणी पिण्याकरिता येतात. यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. महावितरण प्रशासनाला जबाब विचारले तर प्रशासना कडुन सांगण्यात आले की आपल्या ग्रामपंचायत शेळद कडे 15 ते 17 लाखापर्यंत थकबाकी आहे. त्यामुळे आम्ही मीटर व लाईट दिले नाही.
आमच्या संपूर्ण पॅनल व नागरिकांची आपणास विनंती आहे की ग्रामपंचायत चा गलथान कारभार लवकरात लवकर मार्गी लावून येणाऱ्या दोन-तीन दिवसात लाईटचे व्यवस्था करून देण्यात यावी. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशी मागणी नागरिक व बहुजन एकदा पॅनलचे सदस्य व अध्यक्ष यांनी महावितरण च्या अधिकाऱ्याला दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.निवेदन देताना बहुजन एकता पॅनलचे अध्यक्ष शुभम पंजाबराव तिडके, तन्वीर अहमद, गुलाम गोस,सचिन भारसाकळे,आयाज खान, अन्सार खान,सचिन भाऊ पाटील
इत्यादी उपस्थित होते