पातुर येथील साने गुरुजी कला व सांस्कृतिक क्रीडा बहु. मंडळाला भारत सरकारचा राष्ट्रीय युवा पुरस्कार घोषित

भारत सरकार युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय यांच्या वतिने दरवर्षी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य व क्रीडा तसेच लोकजागृती आणि सेवाभावी कार्याकरिता भारत देशात व राज्यात सेवाभावी व सामाजिक कार्य करणाऱ्या युवांना व युवा मंडळाला राष्ट्रीय युवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील पातुर येथील सेवाभावी कार्य करणारे साने गुरुजी कला व सांस्कृतिक क्रीडा बहुउद्देशीय मंडळ,पातुर यांनी सन २०१९-२०२० या वर्षामध्ये मंडळाने ग्रामिण व शहरी भागात पारंपारिक लोककलेचे जतन करत विविध माध्यमातुन प्रबोधन आणि प्रशिक्षण, कार्यशाळा, युवा विकास, दिव्यांग युवकांसाठी, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण, व्यसनमुक्ती व महिला सक्षमीकरण होण्याकरिता कार्य केले आहे त्यांनी विशेष म्हणजे ग्रामिण भागातिल लोकांपर्यंत भारत सरकार व राज्य शासनाच्या विविध योजनेची माहिती गरजु लोकांपर्यंत पोहचून त्यांचे जिवनमानात परिवर्तन करुन रोजगार निर्मिती केली आहे तसेच लोकजागृती करिता नवं उपक्रम घेऊन जल, जंगल, जमिन, जनता व जनावर याचे जतन व संवर्धनासाठी कार्य करत असुन त्यांचे सामाजिक सेवाभावी कार्याची दखल घेऊन युवा कार्यक्रम खेल मंत्रालय भारत सरकार यांचा वतिने आयोजित २६ वा राष्ट्रीय युवा महोत्सव २०२३ हुबळी – धारवाड कर्नाटक राज्यामध्ये होणार आहे त्यामध्ये राष्ट्रीय युवा दिनी दि.१२ जानेवारी २०२३ रोजी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष युवाश्री विशाल राखोंडे यांना मा.प्रधानमंत्री व केंद्रीय क्रीडा मंत्री तथा कर्नाटक राज्याचे राज्यपाल व मुख्यमंत्री तसेच क्रीडा मंत्रालयाचे सचिव यांच्या उपस्थित व त्यांच्या हस्ते गौरवचिन्ह, सन्मानपत्र व ३ लक्ष रुपयाचा धनादेश देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

तसेच त्यांना या अगोदर पण नेहरु युवा केंद्र संगठन,अकोला महाराष्ट्र – गोवा आणि महाराष्ट्र शासन अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय व युवक कल्याण विभागाचा उत्कृष्ट जिल्हा व राज्य युवा मंडळ पुरस्कार मिळाला आहे. या राष्ट्रीय युवा पुरस्कारामुळे त्यांच्या सेवाभावी कार्याला उजाळा मिळाला असुन त्यांनी पातूर व अकोला जिल्ह्याच्या शिरपेच्यात मानाचा तुरा लावण्याचा बहुमान त्यांच्या मंडळाला मिळाला असून पुरस्कार घोषित झाल्याबद्दल त्यांच्या मंडळाचे सर्व स्तरावरुन कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.