जागतिक एड्स दिना निमित्य शाहिरी व लोककलेतून एड्स बाबत जनजागृती

साने गुरुजी मंडळ,पातुर यांनी केले सादरीकरण

जागतिक एड्स दिना निमित्य जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय,अकोला व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोचार रुग्णालय,अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने दि १ डिसेंबर २०२२ रोजी ‘जागतिक एड्स दिना निमित्य शहरात जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी रॅलीला अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप घुगे व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.तरंतुषार वारे यांनी हिरवी झेंडी दाखवुन रॅलीला सुरवात झाली यावेळी रॅलीचे आयोजन शहरात करण्यात आले व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोचार रुग्णालय,अकोला येथील परिसरात आयोजित समारोपी कार्यक्रमात एचआयव्ही प्रतिबंधासाठी एड्स पथकामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांची परिपूर्ण माहिती साने गुरुजी कला व सांस्कृतिक क्रीडा बुउद्देशीय मंडळ,पातूर यांच्या वतीने शाहिरी व लोककला आणि पथनाट्य जनजागृती कार्यक्रमातून माहिती देण्यात आली‌.

जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथकाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी दर्शन जनईकर यांच्या नेतृत्वात व शाहीर विशाल राखोंडे व्दारा लिखित व दिग्दर्शक लोककला व पथनाट्य कार्यक्रम साने गुरुजी मंडळाचे अध्यक्ष व संच प्रमुख सागर राखोंडे व त्यांच्या मार्गदर्शनात शाहीर सुखदेव उपर्वट, प्रकाश इंगोले, दिव्यांग कैलास सिरसाट, गजानन आवटे, गणेश देवकर, आकाश नेमाडे, महेश निंबोळे, हरिओम राखोंडे, सागर पदमने यांनी पथनाट्याच्या माध्यमातून एच.आय.व्ही व एड्स बाबत माहिती देऊन जनजागृती कार्यक्रम सादर केला. यावेळी एचआयव्ही ग्रस्त रुग्णांना भेदभावाची वागणूक मिळू नये यासाठी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना व नागरिकांना शपथ देण्यात आली तसेच समारोपी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी येळणे यांनी तर आभार जिल्हा परिवेक्षक ज्ञानेश्वर भेंडेकर यांनी मानून जागतिक एड्स निर्मूलन दिन साजरा करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published.