गीतांजली महाविद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती कार्यशाळा

अकोला (प्रतिनिधी; प्रशिक मेश्राम) – डिजिटल युगातील वाढत्या फसवणूक प्रकारांविषयी विद्यार्थ्यांना सजग करण्यासाठी गीतांजली महाविद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

या कार्यशाळेत विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले तसेच मोबाईलचा जबाबदारीने वापर करण्याची शपथ देण्यात आली. कार्यक्रम शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. एम. साबू व समन्वयक डॉ. दीप्ती पेटकर यांच्या सहकार्याने घेण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक विनोद तालों यांनी अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये जबाबदार डिजिटल सवयी विकसित होतात, असे मत व्यक्त केले.

सायबर वॉरियर्स कु. अदिती जनोरकर व तनुजा घोगरे यांनी सोशल मीडियाचा योग्य वापर, वैयक्तिक माहितीचे संरक्षण, तसेच फसवे संदेश कसे ओळखावेत याविषयी मार्गदर्शन केले. डिजिटल फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी जागरूकता व सतर्कता हीच खरी ढाल असल्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले.

👉 या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये ऑनलाइन सुरक्षिततेबाबत आत्मविश्वास निर्माण झाला.

Leave a Reply

Your email address will not be published.