दिनांक ०५.०१.२०२४ रोजी पोलीस स्टेशन रामदासपेठ, अकोला येथे फिर्यादी रचि पायन मलाकार, यय ३५ वर्ष, राहणार प्रकाश नगर, महाकाली कॉलनी, मिनार स्टेशन जवळ, पो.स्टे. गांधी चौक, चंद्रपुर यांनी तक्रार दिली की, दिनांक ०५.०१.२०२४ रोजी त्यांची मुलगी कु, गुडडी रवि मलाकार, वय ०५ वर्ष, ही दुपारी १२.३० ते १४.०० वाजता दरम्यान टिळकपार्क जवळील महादेव मंदीराजवळ, मुलांसोबत खेळत असतांना कोणी तरी अज्ञात व्यक्तीने फुरा लावुन पळवुन नेले अशा आशयाची तकार दिल्याने पोलीस स्टेशन रामदासपेठ अकोला येथे अज्ञात आरोपी विरुध्द अपराध क. २९/२४ कलम ३६३ भा. द. वि. अन्वये गुन्हा नोंद करून सदर गुन्हयाचा तपास म.पो. उपनि, संजिवणी पुंडगे यांचे कडे देण्यात आला.
सदर गुन्हयाचे तपासात अपहत मुलीचा व आरोपीचा शोध घेण्या करीता स्थानिक गुन्हे शाखा, व रामदासपेठ पोलीसांनी संयुक्त मोहीम राबविण्यात आली. त्या मध्ये रामदासपेठ पोलीसांना २४ तासाचे आत अपहत मुलीचा व आरोपीचा शोध घेवुन गुन्हयातील महीला आरोपी नामे सलमा परविन अकबरशा उर्फ अजंली रामदास तायडे, वय ४० वर्ष, राहणार बांबु वाडी शंकर नगर अकोटफैल अकोला हीस ताब्यात घेवुन तिला अपहत मुलगी हीचे बाचत विचारपुस केली असता तिने अपहतमुलीचे अपहरण केल्या बाबत कबुली दिल्याने तिचे राहते घर बांबू याडी शंकर नगर येथुन अपहत मुलगी कु. गुडडी वय ०५ वर्ष हीला सुखरूप ताब्यात घेण्यात आले आहे. कोणत्या उद्देशाने बालीकेचे अपहरण केल्याचे याबाबतचा तपास पो.स्टे. रामदासपेठ पोलीस करित आहेत.
सदरची कार्यवाही मा, पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह अपर पोलीस अधिक्षक, श्री अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुभाष दुधगांवकर, शहर विभाग, अकोला यांचे मार्गदर्शना खाली पो. नि. मनोज बहुरे, पोउपनि, संजिवनी पुंडगे, ए.एस.आय शाम शर्मा पो.हवा. हसनखान, किरण गवई पो.ना. तोहीदअली, गितेश कांबळे, म.पो.शि. कावेरी ढाकणे, प्रियंका बागडे, पो. शि. अनिल धनबर, संदीप वानखडे, आकाश जामोदे पो.स्टे. रामदासपेठ अकोला यांनी केली.