
गावातील नागरिकांनी घेतला शिबीराचा लाभ
गायगाव:
‘आरोग्यवर्धिनी उपकेंद्र ‘ गायगाव येथे कॅन्सर रोगनिदान व जनजागृती शिबीराचे तसे आभा कार्ड व आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबीरामध्ये एकुण २६० लाभार्थ्यांनी लाभ घेतला, तसेच १४० लाभार्थ्यांना आभा कार्ड व ८४ लाभार्थ्यांना एबी – गोल्डन- कार्ड शिबीरामार्फत काढून देण्यात आले.
तसेच शिबीरात आलेल्या रुग्णांची आरोग्य विभाग उपकेंद्र – गायगाव चे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ अनुप्रताप जयराज व प्रा. आ. केंद्र हातरुण च्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नलीनी तायडे यांच्या द्वारे तपासणी करण्यात आली. तसेच रिलायन्स कॅन्सर हॉस्पीटलचे कर्करोग तज्ञ डॉ. दिनेश पवार व डॉ. मेघना वानखडे यांच्याद्वारे शिबीरातील रुग्णांची तपासणी करण्यात आली.
शिबीर यशस्वी करण्याकरीता गायगावच्या सरपंच सौ. दिपमाला वानखडे तसेच ग्रामसेवक पी. जामोदे प्रा. आ. केंद्र हातरुणचे वै. अधिकारी डॉ नलीनी तायडे, उपक्रेंद्र गायगाव चे समुदाय अधिकारी डॉ. अनुप्रताप जयराज यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सहाय्यक गुलवाडे, आरोग्यसेवक वाळले व दांदळे, आरोग्यसेविका वेले, गटप्रवर्तिका थोटे, आशासेविका धांडे, वानखडे, दिगे, इंगळे, रिलायन्स हॉस्पीटलचे व्यवस्थापक वाडेकर व झाडे व यांनी अथक परिश्रम घेतले व आपली सेवा दिली.
गावातील नागरिकांनी वरील सर्व चमुचे आभार मानले.