
राशी केली दिव्यांगांना समर्पित
अकोला:
स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे संस्थापक अध्यक्ष व शिवाजी महाविद्यालय अकोला चे प्रा.विशाल कोरडे यांना राष्ट्रीय स्तरावरील नामांकित मीती एंटरटेनमेंट ग्रुप तर्फे गगनाला पंख नवे हा पुरस्कार 17 डिसेंबर २०२२ रोजी रवींद्र नाट्य मंदिर मुंबई येथे प्रदान करण्यात आला. आपल्या अपंगत्वावर मात करून प्रा.विशाल कोरडे यांनी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला ची स्थापना केली. संपूर्ण भारतभर दिव्यांगांच्या शिक्षण ,रोजगार व आरोग्यासाठी एवढे च नव्हे तर लुईस ब्रेल वाचक लेखनिक बँक च्या माध्यमाने सुद्धा कार्य करीत आहेत. भारताचे प्रतिनिधित्व इटली येथील संगीत चर्चा सत्रात त्यांनी केले आहे. देश-विदेशातून विविध पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत .
चित्रपट सृष्टीतील मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.स्नेहलता देशमुख ,उत्तरा मोने व दीक्षा भागवत यांच्या हस्ते मानपत्र ,२५ हजार रोख व भेटवस्तू देऊन प्रा.कोरडे यांचा गौरव करण्यात आला* . सत्कार समारंभात मनोगत व्यक्त करताना प्रा.कोरडे यांनी हि पुरस्कार राशी दिव्यांगांना समर्पित केल्याचे म्हटले. या राशीतून अंध विद्यार्थ्यांना ब्रेल पुस्तके व शैक्षणिक साहित्य दिले जाणार असल्याचे सांगितले . आपल्या मनोगतात दिव्यांग शिक्षणासाठी येणाऱ्या अडचणी व समाजाचा सहभाग कसा नोंदवता येईल ?याविषयी प्रा.कोरडे यांनी आव्हान केले . राष्ट्रीय स्तरावर नामांकित गगनाला पंख नवे पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे प्रा.संजय खडसे ,समाज कल्याण अधिकारी डी.एम.पुंडे, सामान्य रुग्णालयाच्या डॉ.तरंग तुषार वारे,आमदार रणधीर सावरकर,शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे प्रशांत देशमुख,दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे अनामिका देशपांडे ,विजय कोरडे ,तृप्ती भाटिया ,श्रद्धा मोकाशी ,श्वेता धावडे ,स्वाती झुनझुनवाला,भारती शेंडे , डॉ.उज्वला मापारी ,किशोर पाटील ,कीर्ती मिश्रा ,आकाशवाणी प्रमुख विजय दळवी यांनी प्रा.विशाल कोरडे यांचे अभिनंदन केले .
