प्रा.विशाल कोरडे यांना गगनाला पंख नवे पुरस्कार घोषित…

अकोला : स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे संस्थापक अध्यक्ष व श्री शिवाजी महाविद्यालय अकोला चे सहाय्यक प्रा.विशाल कोरडे यांना *राष्ट्रीय स्तरावर मानांकित गगनाला पंख नवे हा पुरस्कार जाहीर झाला आहे सदर पुरस्कार मिती इंटरटेनमेंट ग्रुप तर्फे महाराष्ट्र ,राजस्थान ,दिल्ली व हरियाणा प्रांतातील दिव्यांग व्यक्तीला त्याच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याबद्दल दिला जातो*

आपल्या अपंगत्वावर मात करून प्रा.विशाल कोरडे यांनी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला ची स्थापना केली असून संपूर्ण भारतातील दिव्यांग बांधवांच्या शिक्षण ,रोजगार व आरोग्यासाठी ते कार्य करीत आहेत.*त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व इटली येथील जागतिक संगीत चर्चासत्रात केले आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी लुईस ब्रेल वाचक व लेखनिक बँक अकोला ची स्थापना केली आहे विदर्भातील पहिले ब्रेल ग्रंथालय प्रा.विशाल कोरडे यांनी शिवाजी महाविद्यालय अकोला येथे स्थापन केले आहे*.मतदार साक्षरता अभियान अकोला जिल्ह्याचे ते ब्रँड अँबेसिडर होते. आदर्श प्राध्यापक हा नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड युनिट महाराष्ट्र नाशिक तर्फे पुरस्कार त्यांना प्रदान झाला आहे अशा विविध पुरस्कार व सन्मानाने त्यांनी अकोला च्या मानात भर टाकली आहे.*17 डिसेंबर २०२२ रोजी मुंबई येथील सुप्रसिद्ध रवींद्र नाट्य मंदिर येथे चित्रपट सृष्टीतील मान्यवरांच्या हस्ते प्रा.विशाल कोरडे यांना गगनाला पंख नवे हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

पुरस्कार घोषित झाल्याबद्दल दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे अनामिका देशपांडे,अरविंद देव,डॉ.संजय तिडके,विशाल भोजने,अंकुश काळमेघ,श्वेता धावडे,पूजा गुंटीवार ,विजय कोरडे , डॉ.नितीन उपाध्ये ,राम शेगोकार ,शिवाजी शिक्षण संस्था अमरावती चे श्री.हर्षवर्धन देशमुख,डॉ.विठ्ठल वाघ, महादेवराव भुईभार,प्राचार्य अंबादास कुलट ,डॉ.किशोर देशमुख,अशोक चंदन व अनुराग मिश्र यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.