अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन गावकऱ्यांची फसवणूक,
काय खरं काय खोटं…

स्थानिक: अकोला
पातुर येथील विवरा गावातील प्रशांत मेसरे नावाचा युवक होमगार्ड मध्ये काम करतो. गेल्या आठ दिवसापासून त्याची प्रकृती बरी नसल्याने त्याला दवाखान्यात घेऊन जाण्यात आले तेथे डॉक्टरांनी मृत घोषित केल्याची माहिती प्रशांतच्या कुटुंबातील लोकांनी गावकऱ्यांना दिली. प्रशांत ला गावात घेऊन आल्यावर वडिलांनी मृत व्यक्ती जवळ कुणालाही भटकू दिले नाही. गावातून निघताना किमान 700 मीटर गेल्यावरती त्याच्या हालचाली सुरू झाल्या आणि नंतर गावकऱ्यांनी त्याला मंदिरात घेऊन गेले आणि मंदिरात अंधश्रद्धेला बळी पडलेल्या लोकांनी लोटांगण घेतले व चक्क प्रशांत मेसरे नामक युवक ज्याला मृत घोषित केलं होते तो उठून बसला.

तेव्हा संपूर्ण गावांमध्ये खळबळ उडाली प्रचंड गर्दी उसळली. त्या गर्दीला आवरण्यासाठी स्थानिक पोलिसांनी धाव घेतली व प्रशांत आणि त्याच्या कुटुबीयांना ताब्यात घेतले. या सर्वांमध्ये गावकऱ्यांशी चर्चा केली असता प्रशांत मेसरेच्या अंगात देवी असल्याचं सांगण्यात येत आहे आणि अंधश्रद्धेला बळी पडलेल्या लोकांनी गावकऱ्यांची फसवणूक केल्याची माहिती देखील केल्याची चर्चा सध्या गावांमध्ये आहे. यात काय खरं काय खोटं याचा तपास करण्याची गरज आहे अशी देखील भावना व्यक्त केली जात आहे.