अकोला:दिनांक ०६/०५/२०२४ रोजी फिर्यादी यांनी तक्रार दिली की, संध्याकाळी १९/३० वा. महिंद्रा अॅन्ड महिंद्रा कंपनीमध्ये काम करीत असुन फिर्यादी व त्यांचा मित्र दिपक वंक्टे हे जेवण करून दोघे जन मोटरसायकल ने फिरत असतांना रात्री २२/०० वा. त्यांचे महिंद्रा फोर व्हिलर स्टॉक यॉर्ड मधील नंबर नसलेली नवीन फोर व्हीलर गाडी XUV 700 गाडी स्पेशल ईडीशन ब्लेज मॅटफिनिश रेड रंगाचा गाडी किंमत २६,००००० /- (सब्बीस लाख) गाडी हि अकोला शिवणी विमानतळाकडे जात असतांना दिसली गाडीमध्ये दोन अज्ञात इसम गाडी चालवितांना दिसुन आले त्यांना आवाज देवुन गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला असता ते गाडी घेवुन पळुन गेले वरून फिर्यादी यांनी स्टॉक यॉर्ड मध्ये जावुन पाहीले असता फोर व्हीलर गाडी XUV 700 गाडी स्पेशल ईडीशन ब्लेज मॅटफिनिश रेड रंगाचा हि गाडी दिसुन आली नाही वरून सदरची गाडी कोणीतरी अज्ञात इसमांनी चोरून नेली आहे अशा फिर्यादीचे जबानी रिपोर्ट वरून तपासात घेतला.सदर गुन्हयाचे तपासात पो स्टे एमआयडीसी अकोला यांनी वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली तपास करून मिळालेल्या माहीतीचे आधारे गुन्हयातील आरोपी १) मिर्झा अबेद बेदमिर्झा सईद बेग रा. कलाल चाळ अकोला यास व चार विधी संर्घष ग्रस्त बालक यांना तपास कामी ताब्यात घेवुन तपासा दरम्यान गुन्हयातील चोरीला गेलेले वाहने एकूण तीन फोर व्हिलर गाडी ज्यामध्ये दोन महिंद्रा गाडी XUV 700, प्रत्येकी किंमत २६ लाख एकुण ५२ लाख तसेच एक महिंद्रा स्कॉपिओ एन झेड टु पांढ-या रंगाची फोर व्हिलर गाडी किंमत १७ लाख रूपये तसेच गुन्हयात वारलेल्या दोन मोटर सायकल प्रत्येकी किंमत ५० हजार रूपये एकुण १ लाख रू. एकुण सर्व मुद्देमालाची किंमत ७०,००००० (सत्तर लाख) रू च्या किंमतीचा तपासात जप्त करण्यात आल्या आहेत. सदर गुन्हयात आणखीन वाहने मिळुन येण्याची शक्यता आहे. सदरची कार्यवाही हि मा. पोलीस अधिक्षक साहेब श्री बच्चन सिंह साहेब, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री अभय डोंगरे साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकक्ष श्री सतिष कुळकर्णी साहेब यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक वैशाली मुळे एमआयडीसी अकोला पो. उपनि. सुरेश वाघ, ए एस आय विजय जामनिक, ए एस आय राठोड ब में १४८, पोहेका विजय अंभोरे १४६३, अजय नागरे १८१४, मोहन ढवळे १८२३, सुनिल टाकसाळे १५२०, उमेश इंगळे ६४९, पो कॉ मोहन भेंडारकर २१९०, भुषण सोळंके २०९, अनुप हातोळकर ५२३, सचिन घनबहादुर १६७१, निलेश वाकोडे, सर्व पोलीस स्टेशन एमआयडीसी अकोला यांनी कामगीरी पार पाडली आहे.