
-स्थानिक श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात न्याय सहाय्यक वैद्यकशास्त्र फॉरेन्सिक सायन्स विभागाद्वारे राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून *न्यायिक 2025* या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी तसेच अमरावती येथील विभागीय न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा अमरावती येथील सहसंचालक शर्वरी कुलकर्णी व रामदास पेठ पोलीस स्टेशन अकोला येथील ठाणेदार मनोज बहुरे, महादेवरावजी भुईभार हे उपस्थित होते . सदर कार्यक्रमास महाविद्यालयाच्या विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. नितीन मोहोड व आक्यूएसी चे समन्वयक डॉ आशिष राऊत , फॉरेन्सिक सायन्स विभागाचे विभाग प्रमुख डॉ. संतोष बदने हे उपस्थित होते.

याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संतोष बदने यांनी केले. “विद्यार्थ्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमात कौशल्य प्राप्त केल्यास चांगले मनुष्यबळ तयार होऊन विकसित भारताचे स्वप्न निश्चित पूर्ण होऊ शकेल” असे विचार सतीश कुलकर्णी यांनी मांडले तसेच न्यायवैद्यक शास्त्र विषयात भविष्यात भरपूर संधी उपलब्ध आहेत व विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमातून विविध व्यवसाय निर्माण करणे शक्य आहे व नोकरीच्या संधी देखील मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत असे मत शर्वरी कुलकर्णी यांनी मांडले अध्यक्षीय भाषणातून प्राचार्यांनी विषयाचे महत्त्व विशद करून पुढील वर्षीपासून विद्यार्थ्यांकरिता पदव्युत्तर एम एस सी फॉरेन्सिक सायन्स सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले या कार्यक्रमाच्या अंतर्गत शिक्षक पालक सभा घेण्यात आली यावेळी पालकांनी आपल्या शंकांचे निराकरण करून घेतले, वरील कार्यक्रमास फॉरेन्सिक सायन्स विभागाच्या शिक्षिका श्रेयांशी धरणे यांनी नेट परीक्षा पास केल्याबद्दल त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला तसेच सदर कार्यक्रमास फॉरेन्सिक सायन्स विभागाचे सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास डॉ. नाना वानखडे डॉ.संजय पोहरे, डॉ.बेलसरे आदी सह महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.