लोक कला साहित्य संमेलनात दिव्यांग सोशल फाउंडेशन ची संगीतमय प्रस्तुती संपन्न

अकोला:स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या माध्यमाने प्रा.विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण भारतभर विविध सामाजिक उपक्रम निरंतर राबवले जात आहेत. दिनांक 23 नोव्हेंबर २०२२ रोजी तिसरे लोककला साहित्य संमेलन श्री शिवाजी महाविद्यालय येथे पार पडले. या संमेलनात दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला ची दिव्यांग गायिका कु.वैभवी गवई हिने आपली संस्कृती जपत लावणी लोककलेच्या प्रस्तुतीकरणाने उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. आपल्या अंधत्वावर मात करत वैभवी गवई हिने संगीत क्षेत्रात विविध स्पर्धांमध्ये दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे नाव उंचावले आहे. वैभवी गवई बाल वयापासूनच प्रा.विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात शास्त्रीय संगीताचे धडे गिरवत आहे.

सदर लोककला संमेलनात बाजीराव मस्तानी चित्रपटातील कलावंत डॉ.गणेश चंदनशिवे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.आयोजन समिती तर्फे वैभवी गवई, प्रा.विशाल कोरडे व अंकुश काळमेघ यांचा सत्कार करण्यात आला.डॉ.चंदनशिवे यांनी संस्थेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.दिव्यांग कलावंतांच्या प्रस्तुतीकरणासाठी डॉ.रावसाहेब काळे, डॉ.सोपान वतारे,प्रा.हर्षवर्धन मानकर ,संस्थेचे विशाल भोजने, अनामिका देशपांडे व प्रा.अरविंद देव यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published.