अकोला – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडी अकोलाच्या वतीने मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार समारंभाचे आयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडी जिल्हाध्यक्ष उमेश यांनी केले होते. सदर सत्कार समारंभ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे पश्चिम विदर्भ प्रमुख डॉ अरुण चक्रनारायण यांच्या मार्गदर्शनात व जिल्हाध्यक्ष देविलाल तायडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने पोलीस दलात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक (ASI) सागर बंडू देशमुख अकोला पोलीस खेळ – ॲथलेटिक्स राष्ट्रीय खेळाडू- सुवर्ण पदक विजेता,अखिल भारतीय पोलीस क्रिडा स्पर्धा – सुवर्ण पदक विजेता, अमरावती विद्यापीठ कलरकोट ,पोलीस विभागात सलग 7 वर्ष उत्कृष्ट खेळाडू म्हणून सन्मान,महाराष्ट्र पोलीस क्रिडा स्पर्धा मध्ये सलग सुवर्णपदक विजेता, ॲथलेटिक्स या खेळाचा एन.आय.एस डिप्लोमा व एन.आय.एस प्रशिक्षक तसेच पुजा शांताराम भटकर खेळ – ॲथलेटिक्स,कबड्डी खेळाडू,आतंराष्ट्रीय मास्टर स्पर्धा – साउथ कोरिया सुवर्ण पदक विजेता, महाराष्ट्र राज्य पोलीस किडा स्पर्धा – रौप्य पदक विजेता, सलग ४ वर्षे पोलीस दलात उत्कृष्ट खेळाडू म्हणून सन्मान, कबड्डी या खेळाची राष्ट्रीय खेळाडू ,विद्यापीठ कलरकोट विजेता,कबड्डी,या खेळाचा एन.आय.एस डिप्लोमा, एन.आय.एस प्रशिक्षक, यांचा विशेष सत्कार करण्यात आला तसेच शिवण्या मानकर, स्वराली मानकर, प्राची वाहूरवाघ, अभिजीत इंगळे, रुणाली डोंगरे, यश डोंगरे, काजल वानखडे, कोमल वानखडे, तन्मय जगताप ईत्यादी विविध क्रिडा स्पर्धेत पदक विजेता खेळाडू चा सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथि म्हणून जिल्हा महासचिव दिवाकर गवई, राजकन्या सावळे, पि. एस. आय रमेश जंजाळ होते. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून महेन्द्र भोजने,सतिश तेलगोटे,शिलवंत वानखडे,रविंद्र डोंगरे,कैलास गवई, यशवंत इंगोले, सुनिल तायडे, सुजता वाहूरवाघ, प्रदिप धांडे, पंकज तायडे, रविंद्र इंगळे, श्रीकृष्ण हिरोडे,चंद्रकला तायडे, डी. एस तायडे, गंगा गवई, रुक्मिणी इंगोले, माधुरी मानकर,प्रमिला वानखडे,जितेन्द्र अहीर ,हिम्मतराव सदाशिव उपस्थित होते, कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एम.एम.तायडे व प्रास्ताविक प्रमोद तेलगोटे यांनी केले. तर आभार प्रदर्शन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडी चे जिल्हा महासचिव महेंद्र भोजने यांनी केले.


