आरोग्य दूत आशिष सावळे यांचा सत्कार…

अकोला : महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना चे माजी जिल्हाध्यक्ष तथा रुग्णसेवक आशिष सावळे यांचा उत्कृष्ट रुग्णसेवक म्हणून आमदार तथा अभ्यागत समिती सदस्य रणधीर सावरकर यांच्या हातून करण्यात आला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सरवोपचार रुग्णालय मध्ये दी. 7 ते 8 रोजी असे दोन दिवस आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरात 32 हजाराहून रुग्णांना मार्गदर्शन करणे, त्यांना ओपीडी ला नेने, डॉक्टर ला दाखवणे. रुग्णांना सोनोग्राफी, एक्स रे, सी. टी स्कॅन सांगितल्या नंतर त्यांना त्या ठिकाणी करून देणे.
तसेच रुग्णसेवक आशिष सावळे यांनी विविध आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर आयोजित करणे, लेडी हार्डीग, जी.एम.सी. कीवा खाजगी हॉस्पिटल असो रुग्णांना ॲडमिट करणे, डॉक्टर सोबत बोलून त्यांचा फोलाप घेणे, गरज भासल्यास रक्त पुरविणे असे अनेक उत्कृष्ट काम त्यांनी केले असून असून शासणानी अनेक पुरस्कार व प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.या सगळ्याची दखल घेत रुग्णसेवक आशिष सावळे यांना प्रशस्तीपत्र व शिल्ड देऊन सत्कार करण्यात आला.
यामध्ये अभ्यागत समिती सदस्य रणधीर सावरकर यांनी त्यांना मनापासून आभार मानले व या पुढे ही याही पेक्षा जास्त आपण रुग्णसेवा करा आपल्याला कुठल्या ही प्रकारची अडचण असल्यास आम्ही तुमच्या सोबत आहोत, असे आश्वासन दिले व आभार करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख उपसथिती आ. रणधीर सावरकर, आ. हरीश पिंपळे, माजी महापोर विजय अग्रवाल, भाजपचे जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील, महानगराध्यक्ष जयंत मसने, उपसंचालक आरोग्य सेवा तथा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे, नोडल ऑफिसर डॉ दिनेश. नैताम, अनुप धोत्रे, अनुप शर्मा, डॉ.अमित कावरे, रुग्ण कल्याण समिती सदस्य नितीन सपकाळ, आशिष तायडे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.