
अकोला: स्थानिक बार्शीटाकळी येथे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर व प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या आदेशान्वये व जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे व जिल्हा महासचिव मिलिंद भाऊ इंगळे यांच्या मार्गदर्शनात अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्याची विस्तारीत कार्यकारणी गठित झाली. यामध्ये नवीन पदाधिकारी यांचा समावेश करण्यात आला बार्शीटाकळी तालुक्याच्या कार्याध्यक्षपदी गोरसिंग भाऊ राठोड यांची नियुक्ती करण्यात आली असून या कार्यक्रमाला उपस्थित काही तालुक्यातील पदाधिकारी महासचिव अजय आरखराव, संघटक हरीश रामचवरे, ता.प्रसिद्ध प्रमुख मिलिंद करवते, युवा तालुकाध्यक्ष अमोल जामनिक, माजी ता. प्रवक्ता शुद्धोधन इंगळे, युवक आघाडी जिल्हा सचिव श्रीकृष्ण देवकुणबी,माजी तालुका प्रसिद्धी प्रमुख राजेश खंडारे, युवा कोषाध्यक्ष नितेश खंडारे, अरविंद राठोड, साहिल गवई, धर्मवीर गवई,राजदीप वानखडे, जेष्ठ कार्यकर्ते सावद,ज्यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहेत ते कार्याध्यक्ष गोरसिंग राठोड तालुका उपाध्यक्ष वसंता चव्हाण, श्रीकृष्ण सोळंके,अनिल चव्हाण,श्रीकृष्ण भगत, उमेश गवई,पंकज आंधळे, विलास वाहुर वाघ, तालुक्याच्या सचिव पदावर रामेश्वर राठोड, दिनेश खंडारे, नंदकिशोर नागीले, देवानंद पवार, राजू पवार, संजय महाजन, शेषराव तायडे, सहसचिव पदावर विश्वजीत खंडारे, नितीन पवार गौतम शिरसाट विशाल भाकरे रोशन चोटमल, विठ्ठल नवलकर पांडुरंग लोथे, शेख जाबीर शेख साबीर, सदस्य पदावर अशोक चव्हाण प्रवीण जाधव सुधीर वरठे गजानन जाधव आणि तालुक्याच्या मीडिया प्रमुख पदी निलेश विश्वनाथ इंगळे यांची नियुक्ती करण्यात आली.
या सगळ्यांचा परिचय व सत्कार समारंभ सरते शेवटी कार्याध्यक्ष गोडसिंग भाऊ राठोड यांनी आपले मनोगत व्यक्त करून सर्व पदाधिकाऱ्यांना कामाच्या शुभेच्छा दिल्या व आभार प्रदर्शन वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते साहिल गवई यांनी केले.