स्थानिक: अकोला येथील माणेक टॉकीज जवळ २५ वर्षीय विजय दीपक काळे उर्फ जॉय नामक युवकावर १८ मार्चच्या सायंकाळी ५ वाजता काही युवकांनी चाकूने प्राणघातक हल्ला केला. सदर युवक हा न्यू तारफाईल, अकोला येथील राहवासी असून गंभीर जखमी झाल्याने रामदास पेठ येथील पोलिसांनी जखमी युवकाला शासकीय जिल्हा रुग्णालय अकोला येथे भरती करण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहे. सद्या सर्व प्रकारावर रामदास पेठ पोलीस पळतळणी करीत आहे.