ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट
मुंबई: गायारान जमीन आणि राहण्यासाठी केलेले अतिक्रमण याविरोधात अधिकाऱ्यांनी एकतर्फी कारवाई करण्यात सुरुवात केल्याने राज्यभरात खळबळ उडाली होती. तेव्हा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
त्यावेळी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली आणि सांगितले की, गायरान जमीन आणि राहण्यासाठी केलेले अतिक्रमण याविरोधात अधिकाऱ्यांनी एकतर्फी कारवाई सुरू केली आहे. अनेक जिल्हा,तालुका, गावांमध्ये घरं का पाडू नये म्हणून नोटिसा दिल्या होत्या. काही ठिकाणी घरं पाडण्यात ही आली. दहशत निर्माण करण्याची ही पद्धत आहे.
मुंबई उच्च न्यायलयाने एकतर्फी निर्णय देताना कशा प्रकारे गायरान जमिनी नावावर करून घेतल्या पाहिजे,नियमित केल्या पाहिजे याची कुठलीही दाखल घेतली नाही. महाराष्ट्राचे ॲडवोकेट जनरल यांच्या मार्फत न्यायालयाकडून मुदत वाढवून घ्यावी व ज्यांच्या जमिनी नियमित होऊ शकतात त्या ताबडतोब नियमित करण्याची सक्त ताकीद अधिकाऱ्यांना द्यावी, त्याचा अहवाल न्यायालयात सादर करावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली.
राज्यात २२ लाखांहून अधिक लोकांना याचा फटका बसतोय. मुख्यमंत्र्यांनी ही मागणी मान्य केली असून येणाऱ्या ४ दिवसांमध्ये शासन न्यायालयात ही भूमिका मांडेल ही अपेक्षा देखील व्यक्त केली आहे.