ई-युगात विद्यार्थ्यांनी भावना जोपासणे गरजेचे – प्रा. राहुल माहुरे

अकोला-(दि १० नोव्हेंबर,२०२२):-

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर अंतर्गत येणाऱ्या स्व.वसंतराव कोल्हटकर कला महाविद्यालय, रोहणा,ता.आर्वी जि. वर्धा या महाविद्यालयात युजीसी नवी दिल्ली अंतर्गत इंडक्शन प्रोग्राम आणि विविध विषयाच्या अभ्यास मंडळाचे उद्घाटन प्राचार्य डॅा नितीन माथनकर यांच्या मार्गदर्शनात संपन्न झाले. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हनुन बोलताना प्रा राहुल माहुरे यांनी वरील प्रतिपादन केले.याप्रसंगी विचार मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॅा नितीन गौरखेडे, प्रमुख अतिथी प्रा ॲड आकाश हराळ उपस्थीत होते. कार्यक्रमाची सुरुवात महामानवांच्या प्रतिमांना हारार्पन आणि पुजन करुन करण्यात आली. कार्यक्रमाचे संयोजक डॅा रुपेश देशमुख यांनी पाहुण्यांचा परियच आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. विविध विषयांच्या अभ्यास मंडळांचे उद्घाटन झाले असे मान्यवरांनी जाहीर केले. पुढे बोलतांना प्रा राहुल माहुरे म्हणाले की, आज ई-युगात मनुष्य आभासी पध्दतीने एकमेकांशी खुप जवळ आला पण भावनिक दृष्ट्या व्यक्ती-व्यक्ती मधील अंतर खुप वाढत गेले. संवाद हरवला, भावनाशून्य व्यक्ती झाला असे वातावरण समाजात वावरतांना आपल्याला दिसुन येते. मानसिक दृष्ट्या मानवाने मानवाशी थेट संवाद साधणे गरेजेचे असते. विद्यार्थ्यांना भविष्यात येणाऱ्या अडचणींपासुन वाचवण्यासाठी एकमेकांशी भावना आणि संवाद जोपासणे गरेजेचे आहे असे सांगितले.

प्रमुख अतिथी म्हनुन बोलतांना प्रा. ॲड. आकाश हराळ यांनी विद्यार्थ्यांना इंग्रजी संभाषण आणि कौशल्यांसदर्भात विविध उदाहरणाद्वारे सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हनुन अध्यक्षीय भाषनात डॅा नितीन गौरखेडे यांनी महाविद्यालयाचा सविस्तर आढावा आणि कार्याचा अहवाल मांडला. कार्यक्रमाचे संचालन डॅा महेंद्र झलके यांनी तर आभारप्रदर्शन डॅा डि एस उंबरकर यांनी केले. याप्रसंगी डॉ तीर्थनंद बन्नगरे, डॉ ममता साहू, प्रा. एस.एम. कावड़े, डॉ आर आर माणिकपुरे उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी अथक परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published.