कर्तव्य बजावताना वीरमरण… अकोल्याचा सुपुत्र हवालदार नितेश घाटे यांना वीरगती!

कुरणखेड (ता. अकोला) | प्रतिनिधी:- कर्तव्यावर असताना देशासाठी जीवन अर्पण करणाऱ्या अकोला जिल्ह्याच्या सुपुत्राचा अभिमानास्पद त्याग! युनिट 5 मराठा, अयोध्या कंटोनमेंटमध्ये कार्यरत असलेले कुरणखेड येथील हवालदार नितेश घाटे (वय अंदाजे ३२) यांना काल ड्युटी दरम्यान वीरमरण आले. त्यांच्या आकस्मिक निधनाची बातमी कळताच कुरणखेडसह संपूर्ण अकोला जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

हवालदार नितेश घाटे हे अत्यंत शिस्तप्रिय, कर्तव्यनिष्ठ आणि देशासाठी तनमनाने समर्पित जवान होते. देशसेवेतील त्यांचे योगदान अविस्मरणीय राहणार आहे. त्यांनी ड्युटीवर असताना दाखवलेले धैर्य व समर्पण भावी पिढीला प्रेरणा देणारे आहे.

त्यांचे पार्थिव शरीर आज दिनांक ३० जुलै २०२५ रोजी सकाळी कुरणखेड येथे आणले जाणार असून, दुपारी १२ वाजता त्यांच्या वाड्यातून अंतिम यात्रा निघेल. त्यानंतर पूर्ण लष्करी सन्मानाने अंत्यविधी पार पाडण्यात येणार आहे.

अकोला जिल्ह्यातील सर्व आजी-माजी सैनिक बांधवांनी, देशभक्त नागरिकांनी, युवकांनी व स्थानिक प्रतिनिधींनी शेवटचा निरोप देण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

‘जय जवान, जय हिंद!’ या घोषणा देत एक वीरपुत्र आपल्यातून निघून गेला… पण त्याचे कर्तृत्व अमर राहील!’

Leave a Reply

Your email address will not be published.