आचार संहिता काळात गावठी हातभ‌ट्टी दारूच्या जिल्हयात वेगवेगळया ठिकाणी ०२ मोठ्या कारवाई

आचार संहिता काळात गावठी हातभ‌ट्टी दारूच्या जिल्हयात वेगवेगळया ठिकाणी ०२ मोठ्या कारवाई

एकुण ७० लिटर हातभ‌ट्टीची गावठी दारू व ५५५ लिटर सहवा मोहमाच असा एकुण ८२,३००/ रुचा मुद्देमाल जप्त

आगामी येणा-या लोकसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने मा, पोलीस अधिक्षक अकोला श्री. बच्चन सिंह

सा. यांनी अकोला जिल्हयातील अवैध दारू विक्री करणारे तसेच गावठी हातभ‌ट्टीवर दारू तयार करून विक्री करणा-यां

आरोपीतांविरूध्द कारवाई करणे करिता स्था.गु.शा. अकोला येथील अधिकारी व अंमलदार यांचे पथके गठीत करून त्याबाबतची माहिती घेवुन कारवाई करणे करिता आदेशीत केले असता स्था.गु.शा. अकोला येथील पथकांनी गुप्त माहितीवरून खालील प्रमाणे कारवाई केल्या

दिनांक १६/०४/२०२४ रोजी पो.स्टे. चान्णी हद्दीमध्ये ग्राम आलेगाव येथे छापा कारवाई केली असता आरोपी नामे देवदत्ता सुखदेव तेलगोटे, वय ४९ वर्ष रा. ग्राम आलेगाव, ता. पातुर जि. अकोला याचे जवळुन ४० लिटर गावठी हातभ‌ट्टीची दारू व सडवा मोहमाच २२५ लिटर व ईतर साहित्य असा एकुण २६,५००/रू चा मुद्देमाल जप्त करून आरोपी मुद्देमालसह पुढील कायदेशीर कारवाई कामी पो.स्टे. चान्नी यांचे ताब्यात देण्यात आले.

दिनांक १६/०४/२०२४ रोजी पो.स्टे. बार्शिटाकळी हद्दीमध्ये ग्राम वरखेड खदान शेतशिवाराजवळ छापा कारवाई केली असता आरोपी नामे नितीन सुभाष पवार, वय ३० वर्ष रा. ग्राम वाघजाळी ता. बार्शिटाकळी जि. अकोला याचे जवळून ३० लिटर गावठी हातभ‌ट्टीची दारू व सडवा मोहमाच ३३० लिटर व ईतर असा एकुण ५५,८००/रू चा मुद्देमाल जप्त करून आरोपी मुद्देमालसह पुढील कायदेशीर कारवाई कामी पो.स्टे. बार्शिटाकळी यांचे ताब्यात देण्यात आले.

वरील ०२ कारवाईमध्ये एकुण ०२ आरोपीतांविरुध्द कारवाई करून त्यांचेजवळुन एकुण ८२,३००/ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह सा., मा.अपर पोलीस अधिक्षक श्री अभय डोंगरे सा, यांचे मार्गदर्शनाखाली पो. नि शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा अकोला पो.उप.नि. गोपाल जाधव, पो.उप.नि. आशिष शिंदे व स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील पोलीस अंमलदार दशरथ बोरकर, प्रमोद डोईफोडे, गोकुळ चव्हाण, सुलतान पठाण, विशाल मोरे, अविनाश पाचपोर, वसिमोद्दीन, एजाज अहेमद, स्वप्नील खेडकर, अन्सार अहेमद, लिलाधर खंडारे व चालक पो. अंमलदार प्रशांत कमलाकर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.