
कुटुंब प्रमुख आपल्या परिवारासाठी कोणत्या स्तरापर्यंत जाऊ शकतो याचे चित्रीकरण पहिल्या भागात दाखवून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या दृष्यम २ ने आज परत प्रेक्षकांच्या अपेक्षा पुर्ण करित बाॅक्स आॅफिसवर जोरदार धडक दिली आहे.
महेश देशमुख बिझनेस मॅन त्यांची पत्नी सौ मीरा देशमुख आय पी एस आणि आय जी गोवा यांच्या एकुलत्या एक मुलाचा म्हणजे समीर देशमुख याचा खुन होतो. त्याच्या खुनाचा शोध घेण्यासाठी आपली पुर्ण यंत्रणा आय जी मीरा देशमुख कामी लावतात. तरीही आरोपी विजय साळगावंकर आपल्या परिवाराला निर्दोष सिद्ध करतो.
दृष्यम २ मधे जी उत्सुकता शिगेला पोहचते ती लेखक, दिग्दर्शक, निर्माता आणि सर्व अभिनेते आणि अभिनेत्र्या खुपच उत्तम सादरीकरणातुन प्रेक्षकांच्या पसंतीस नेतात. चित्रपटाच्या शेवटाबाबत लावलेले सर्व कयास फेल ठरतात. अक्षय खन्न्नाचा सरस अभिनय अजय अढाव आय जी गोवा या पात्रामधे खुपच दर्जेदार वाटतो. वसंत सिनेमातील लेझर पिचर क्वालीटी आणि डाॅल्बी साऊँड या सस्पेन्स आणि हाॅरर चित्रपटाला अधिकच आकर्षक आणि मनोरंजक बनवितात.
चित्रपट निर्मीतीत पॅनोरमा मुव्हीज, टि सिरीज मुव्हीज, व्हायाकाॅम 18 मुव्हीज यांनी ताकदिने पैसा ओतला आहे. लेखकाचा दमदार विचार आणि संवादाची भाषा खुपच प्रभावी वापरली आहे. विषेश म्हणजे अत्यंत कमी पैशाचा लोकेशन वापर असला तरी चित्रपट कथानकामुळे कंटावाणे वाटत नाही. गोव्याच्या आणि कोल्हापुरच्या मातीचा आशीर्वाद लाभलेल्या त्यामुळे कोट्यावधीचे हिट सिनेमे देणार्या अजय देवगणला ही भूमि यातही कामी आली असच म्हणावं लागेल.

सालस चेहर्याची अभिनेत्री तब्बू या चित्रपटात कणखर भूमिकेत स्वतःला सिद्ध करित प्रेक्षकांवर दुसर्याही भागात छाप टाकते हे विषेश.
परिवारासह हा चित्रपट पाहण्याचा आनंद हा चित्रपट देतो. फक्त मोबाईल बंद हवा. पुढे काय पुढे काय ही ओढ चित्रपटाच्या यु टर्न घेतलेल्या कथानकामुळे सतत वाढते. अभिषेक पाठक याच्या मेहनतीचे चिज झाले हे चित्रपट गृहातुन बाहेर आल्यानंतर आनंदाने म्हणावेसे वाटते. कथानकाच्या अधिक खोलात न शिरता आपण चित्रपट बघावा असे दुसरा भाग आहे हे निश्चित.
संजय कमल अशोक
7378336699