
विद्यापीठस्तरीय महिला सक्षमीकरण कार्यशाळा संपन्न...
प्रतीनिधी/शुभम गोळे
स्थानिक /अकोला
डॉ बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्र संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती,विशाखा समिती श्री शिवाजी कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अकोला. संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विद्यापीठस्तरीय जिल्हानिहाय महिला सक्षमीकरण कार्यशाळा संपन्न.
संत गाडगेबाबा अमरावती.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मिलिंद बारहाते व डॉ बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ.संतोष बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ रामेश्वर भिसे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेले श्री शिवाजी महाविद्यालय अमरावती मराठी विभाग प्रमुख डॉ वर्षाताई चिखले ,प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणाधिकारी डॉ सुचेता पाटेकर,प्रमुख उपस्थिती शाळा समितीचे निमंत्रित सदस्य प्राध्यापक विलासराव हरणे सिन्हा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ किरण खंडारे, कार्यशाळेचे समन्वयक डॉ. संजय तिडके विशाखा समितीचे समन्वयक प्रा. श्रद्धा पाटील उपस्थित होते.
श्री छत्रपती शिवाजी कॉन्व्हेंट यांच्या तर्फे सावित्रीबाई फुले यांच्या पहील्या मुलींच्या शाळेचा उत्कृष्ट देखावा दाखवण्यात आले. शिक्षणाधिकारी डॉ सुचेता पाटेकर यांनी शिक्षणक्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल सन्मानित करण्यात आले.
महानगरपालिका उपायुक्त यांना देखील उत्कृष्ठ प्रशासकीय अधिकारी म्हणून सन्मानित करण्यात आले.
