अकोला येथील शिवाजी महाविद्यालयमधे भारताचे पहिले कृषीमंत्री तथा श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे संस्थापक अध्यक्ष डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांची १२५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी ध्वजारोहण करून पूर्णाकृती पुतळ्यास हारार्पण करण्यात आले. त्यानंतर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना,राष्ट्रीय छात्र सेनेकडून देखावे तयार करुन शहरातून प्रभातफेरी काढण्यात आली. त्याचप्रमाणे महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ.डॅडी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस हारार्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रशांतदादा देशमुख, महाविद्यालय विकास समिती सदस्य अशोकराव देशमुख , शाळा समिती सदस्य , प्राचार्य डॉ. अंबादास कुलट, मा. प्राचार्य डॉ. थोरात ,इंजिनिअरिंग कॉलेज ,अकोला . मुख्याध्यापक श्री ठोकळ श्री शिवाजी विद्यालय ,अकोला . डॉ.किशोर देशमुख , सांस्कृतिक समन्वयक . डॉ. अनिता दुबे , सहसमन्वयक सांस्कृतिक समिती , डॉ. आनंदा काळे , रजिस्ट्रार अशोक चंदन , शाखाप्रमुख, विभागप्रमुख, प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी व शहरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.