डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सर्वसमावेशक आहेत – डॉ. अशोक इंगळे

अकोला: दि बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी अकोला द्वारा संचालित श्रीमती ल. रा.तो. वाणिज्य महाविद्यालय अकोला, रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशन, विद्यार्थी परिषद व विद्यार्थी मैत्री संघ,यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून दि. बी. जी. ई. सोसायटीचे अध्यक्ष ऍड. मोतीसिंहजी मोहता, प्रमुख वक्ते म्हणून महाराष्ट्रातील सुप्रसिध्द आंबेडकरी साहित्यिक तथा कवी प्रा. डॉ. अशोक इंगळे, महविद्यालयचे प्राचार्य डॉ. एस. जी. चापके,प्रा. प्रकाश गवई, प्रा. आर. डी. क्षीरसागर उपस्थित होते. सोबत रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशनचे अध्यक्ष- ऋतिक वानखेडे, सचिव तन्वी खंडारे, विद्यार्थी मैत्री संघाचे अध्यक्ष राधा इंगळे, सचिव संघर्ष गोपनारायण आदि विचारमंचावर उस्थितीत होते.

“सर्व समावेशक डॉ. बाबासाहेब आंबेडकर” या विषयावर बोलत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे देशाला तारणारे असून राष्ट्र उद्धाराचे बीजे त्यात रोवली आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार,साहित्यिक, अर्थशास्त्रज्ञ, सामाजिक चळवळीचे प्रणेते, कामगार नेते, महिलांचे उद्धारकरते, आदर्श पत्रकार, कायदेतज्ञ, विद्यार्थ्यांचे मार्गदाते अशा विविध भूमिकेतून त्यांनी देशाच्या प्रगतीमध्ये योगदान देवून सर्व समावेशक विचार मांडला आहे. बाबासाहेबांच्या कार्याची महती सांगतांना ‘या सुर्याने ही स्वता:ला भीमराव म्हणून घ्यावे’ असे प्रतिपादन सुप्रसिध्द आंबेडकरी साहित्यिक डॉ. अशोक इंगळे यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऋतिक वानखेडे तर पाहुण्यांचा परिचय अंकुश इंगळे यांनी करून दिला. महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. एस. जी. चापके यांनी आपल्या भाषणात कार्यक्रमाच्या आयोजनाची भूमिका विषद करत गेल्या अनेक वर्षांपासून अखंडितपणे कार्यक्रम सुरू असल्याचे सांगितले. अध्यक्षीय भाषणातून दि बेरार जनरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड. मोतीसिंहजी मोहता यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विदर्भाशी असेलेले नाते यावर साहित्यिकांनी प्रकाश टाकला पाहिजे. विद्यमान परिस्थितीवर भाष्य करताना, तरुणांच्या वाढती बेरोजगारी सदर्भात काम करण्याची गरज असून तरुणांनी व्यवसायातून स्वयंम रोजगाराची निर्मिती केली पाहिजे. फक्त पुस्तकी ज्ञान नाही तर व्यक्तिमत्त्व विकासाचे धडे देखील महविद्यालातून दिले पाहिजे असे आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त घेण्यात आलेल्या तत्वविचार स्पर्धेचे बक्षीस वितरण याप्रसंगी करण्यात आले. तेव्हा प्रा. प्रकाश गवई यांनी विजेत्यांची नावे घोषित करून विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन व बुद्ध वंदना घेवून करण्यात आली. प्रथमेश इंगळे यांनी अभिवादनपर भीम गीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूनम पिसे तर नेहा वानखेडे हीने आभार मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे शिक्षवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, मान्यवर मंडळी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.