डॉ.आंबेडकरांनी या देशातील प्रत्येक मानवासाठी मुक्तीचे लढे उभारले – डॉ. संतोष बनसोड

दि बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी अकोला द्वारा संचालित सीताबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अकोला येथे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन’ या कार्यक्रमाचे दिनांक 20 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता आयोजन करण्यात केले. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून दि बी. जी. ई. सोसायटीचे अध्यक्ष माननीय ऍड. मोतीसिंहजी मोहता हे उपस्थित होते. प्रमुख वक्ता म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील मानव्यविद्या शाखेचे असोसिएट डीन तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्राचे संचालक माननीय डॉ. संतोषजी बनसोड हे होते. “डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मानवमुक्तीचे लढे” या विषयावर व्याख्यानात ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून दि बी. जी. ई. संस्थेचे मानद सचिव माननीय श्री पवनजी माहेश्वरी, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष माननीय श्री रूपचंदजी अग्रवाल, गावातील समाजसेवी मान्यवर, नेतेमंडळी, विद्यार्थी, प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सीताबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोला यांच्या वतीने दरवर्षी महापरिनिर्वाण दिनानिमित्त एक प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित केला जातो.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना पुढे घेऊन जाण्यासाठी आणि त्यांचे विचार समाजात रुजवण्यासाठीचा हा प्रयत्न गेल्या अनेक वर्षापासून, सातत्याने आणि मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. गावातील प्रतिष्ठित नागरिक, विद्यार्थी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रेमी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर डी सिकची यांनी केले आहे.संत गाडगे बाबा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. व्याख्यानाच्या या कार्यक्रमाला मुख्य वक्ता म्हणून अमरावती येथील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या मानव्यविद्याशाखेचे असोसिएट डीन असलेले प्रा. डॉ. संतोष बनसोड हे लाभले होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी उभारलेले मानव मुक्तीचे लढे या विषयावर ते बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मानव मुक्तीच्या लढ्यांची सुरुवात प्रत्यक्ष महाड येथील चवदार तळ्याच्या सत्याग्रहाने केली असली तरी त्यापूर्वी त्यांनी 356 भाषणे या विषयावर दिलेली आपल्याला आढळतात. भारतातील अस्पृश्य आणि अमेरिकेतील निग्रो यांच्या तुलनात्मक अभ्यासातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानव मुक्तीची ही संकल्पना सुचलेली आहे. अमेरिकेमध्ये अभ्यास करत असताना मानव मुक्तीची प्रेरणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मिळाले 1917 पासून सुरू झालेला हा लढा आहे. डॉ. आंबेडकर यांनी उभारलेले मानव मुक्तीचे लढे, काळाराम मंदिर प्रवेश असो, चवदार तळ्याचा सत्याग्रह असो, मनुस्मृति दहन असो, पुणे करार असो, स्वतंत्र भारताची राज्यघटना निर्मिती असो किंवा धर्मांतर असो हे सर्व लढे त्यांनी मानवाच्या मुक्तीसाठी उभारले होते. समाजाचे हे कार्य करत असताना त्यांच्यावर कौटुंबिक आघात फार मोठे झाले तीन अपत्य वारले भाऊ वारले पण तरीही कौटुंबिक भावनेत गुंतून न राहता त्यांनी देशहितासाठी कार्य केले आहे आणि हे केलेला चळवळी ह्या केवळ दलितांच्या नसून त्या संपूर्ण भारतीयांसाठी होत्या हे आवर्जून सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सर्वांगीण विचार विद्यार्थ्यांना अवगत व्हावे आणि त्यांची रुजवणूक होऊन विद्यार्थ्यांनी ते अंगी बाणावे हा या कार्यक्रमाचा मूळ उद्देश आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. डी. सिकची यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामधून या कार्यक्रमासंदर्भात असलेली पूर्वपरंपरा आणि हा कार्यक्रम आयोजित करण्यामागचा हेतू स्पष्टपणे केला. महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष रूपचंदजी अग्रवाल यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या मानव मुक्तीच्या लढा संदर्भात उल्लेख करून चवदार तळ्याचा सत्याग्रह हा केवळ पाण्यासाठी नसून तो मानव मुक्तीसाठी होता असे विचार व्यक्त केले.


अध्यक्षीय भाषणातून दि बेरार जनरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एडवोकेट मोतीसिंह जी मोहता यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला आहे. डॉक्टर आंबेडकरांनी अकोल्याला भेट दिली तेंव्हा बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासात वावरलेल्या व्यक्ती जेव्हा आपल्याला भेटतात आणि बाबासाहेबांचे अनुभव सांगतात तेव्हा आपल्यालाही बाबासाहेबांना भेटल्याचा अनुभव कसा होतो हे आपल्या उगवत्या शैलीतून त्यांनी सांगितले आहे डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे भारतीय राज्यघटनेची एक हस्तलिखितची प्रत उपलब्ध आहे आणि 26 नोव्हेंबर रोजी जेव्हा कोर्टामध्ये ती प्रत आणल्या गेली त्या प्रत वर मी स्वतः हात ठेवून जेव्हा स्पर्श केला तेव्हा मला धन्य झाल्यासारखे वाटले असे बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रति असलेले भावोद्गार ऍड. मोहता यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरुवात भीम गीत आणि स्वागत गीताने केली याकरिता संगीत विभागाचे प्रा. डॉ. अमोल गावंडे आणि त्यांच्या चमुने खास प्रयत्न केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा डॉ प्रसन्नजीत गवई यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभागातील डॉ. कैलास वानखेडे यांनी केले तर इंग्रजी विभागातील प्राध्यापक डॉ. मनीषा कांबळे यांनी आभार मानले. याप्रसंगी विचारपिठावर विद्यार्थी रिपब्लिकन फेडरेशनची अध्यक्ष श्रुती मोरे, सचिव आशिष डोंगरे, उपाध्यक्ष रोशन गावंडे, कोषाध्यक्ष साहिल गोपनारायण हे उपस्थित होते. सीताबाई महाविद्यालयाच्या खुल्या भव्य प्रांगणामध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे विद्यार्थी शहरातील प्रतिष्ठित नागरिक मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.