
अकोला ( दि १३ ॲागष्ट २०२३)
आंबेडकरी चळवळीचे ख्यातकीर्त अभ्यासक, लेखक, विचारवंत प्रा. डॉ. हरी नरके यांचे दि. 9/8/2023 रोजी दुःखद निधन झाले आहे. वैचारिक आणि सामाजिक चळवळीला त्यांचे भरीव योगदान मिळालेले आहे. त्यांच्या जाणाने पुरोगामी चळवळीचे कधीही भरून न निघणारी हानी झालेली आहे. त्यांच्याप्रती कृतज्ञताभाव व्यक्त करण्यासाठी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर टीचर्स असोसिएशन, शाखा अकोला जिल्हा आणि दीनबंधू फोरम, अकोला यांच्या वतीने दिनांक १३ ऑगस्ट ला स्थानिक अशोक वाटिका येथे आदरांजली सभा आयोजित करण्यात आली होती.
या आदरांजली सभेच्या अध्यक्षस्थानि डाटा चे जिल्हाध्यक्ष डॉ प्रसन्नजीत गवई तर प्रमुख उपस्थितीत डाटाचे माजी जिल्हाध्यक्ष प्रा डॉ संदिप भोवते, मराठा महासंघाचे नेते मा प्रदिप चोरे, विद्वत सभेचे डॉ संजय पोहरे, बौद्ध महासभेचे मा वानखडे, उपस्थित होते. तसेच या प्रसंगी डॉ भास्कर पाटिल, डॉ अशोकराव ईंगळे, डॉ ॲड निरज अंभोरे, डॉ राहुल माहुरे, निवेदिका शीला घरडे पाटिल, डॉ दिपक कोचे, डॉ डि आर खंडेराव, सचिनकुमार तायडे, प्रा प्रकाश गवई, डॉ आकाश हराळ, हेमंत सुरडकर, हरिश खंडारे, मा रजाने साहेब, प्रा प्रवीण दामोदर, आदित्य बावनगडे, प्रसिद्ध वक्ते विशाल नंदागवळी उपस्थित होते. सदर सभेचे संचालन डॉ अशोकराव ईंगळे यांनी तर आभार डॉ राहुल माहुरे यांनी मानले.