बार्शीटाकळी : स्थानिक बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर- मोझर रस्त्यावर अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार एक जण जागीच ठार झाला तर एक जखमी झाल्याची घटना १८ मे रोजी सायंकाळी घडली.
बार्शीटाकळी तालुक्यातील टेंभी येथील गणेश भारत तायडे (३०) व राजू जानराव खंडारे (२८) हे मोझर गावात मिस्त्री काम करण्याकरिता गेले होते. काम उरकून सायंकाळी दोघेही घरी परत येत असताना त्यांच्या या मार्गावरील दुचाकीला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली.
या अपघातात गणेश भारत तायडे हे जागीच ठार झाले, तर राजू जानराव खंडारे हे जखमी झाले. याप्रकरणी पिंजर पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल करण्यात आली असून, ठाणेदार अजय कुमार वाढवे पुढील तपास करीत आहेत.