दिव्यांगांना स्वावलंबनासाठी ‘फिरते दुकान’ मिळणार

दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचा उपक्रम

अकोला, दि. 28 : दिव्यांग बांधवांना स्वावलंबनासाठी हरित ऊर्जेवर चालणा-या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (शॉप ऑन ई-व्हेईकल) विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी दि. ६ फेब्रुवारीपूर्वी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस. ए. यावलीकर यांनी केले आहे.

दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयी- सुविधा उपलब्ध करून रोजगारनिर्मितीला चालना देणे, दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या कुटुंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करणे हा योजनेचा उद्देश आहे. ही योजना दिव्यांग बांधवांसाठी १०० टक्के अनुदानावर चालवली जाते.

जिल्ह्यातील अधिकाधिक दिव्यांग बांधवांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी register.mshdfc.co.in या लिंकवर ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन श्री. यावलीकर यांनी केले आहे.

०००

Leave a Reply

Your email address will not be published.