
अकोला ; दि.16 मार्च २०२५ स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या माध्यमाने डॉ.विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात संस्थेचे सदस्य संपूर्ण भारतभर दिव्यांगांसाठी कार्य करीत आहेत . त्यांच्या या सामाजिक कार्याचा भारतातील विविध संस्था गौरव करीत आहेत . नुकताच दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला ची सदस्य अनामिका देशपांडे यांना यंग इंडिया बिजनेस क्लब अकोला तर्फे दिव्यांगांसाठी केलेल्या भरीव योगदानाबाबत सन्मान रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले . समाज कल्याण विभागाद्वारा आदर्श संस्था पुरस्कार प्राप्त दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या माध्यमाने अनामिका देशपांडे यांनी अंध विद्यार्थ्यांसाठी वाचक व लेखनिक म्हणून कार्य करीत असून संस्थेच्या विविध सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग नोंदवित आहे . त्यांच्या या कार्याबाबत माहेश्वरी भवन येथे श्री रमाकांत खेतान, डॉ.देवेंद्र अग्रवाल,मिस इंडिया रुपल मोहता,इती पांडे व डॉ.विशाल कोरडे यांच्या उपस्थितीत सन्मान रत्न हा पुरस्कार प्रदान करण्यात आला . सन्मान रत्न हा पुरस्कार आपले सामाजिक व संगीत क्षेत्रातील गुरु डॉ.विशाल कोरडे यांना समर्पित असून दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या माध्यमाने भविष्यातही दिव्यांगांसाठी कार्य करणार असल्याचे मनोगत अनामिका देशपांडे यांनी व्यक्त केले. आई मेघा देशपांडे,वडील दिगंबर देशपांडे व संपूर्ण कुटुंबाचे सामाजिक कार्यात निरंतर प्रोत्साहन मिळत असल्याचे ती सांगते .अनामिका देशपांडे यांच्या या सत्कारा बाबत दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे सदस्य विजय कोरडे, अस्मिता मिश्रा, भारती शेंडे, डॉ.कालिंदी कोलते, डॉ.अरुणा सिंगी, अरविंद तिडके, सरोज तिडके, अरविंद पिंपळे, अखिलेश गाडगे, नीता वायकोळे , दुर्गा दुगाने, डॉ.संजय तिडके, अरविंद देव, पूजा गुंटीवार, विशाल भोजने, अंकुश काळमेघ, डॉ.अर्चना मोरे, श्वेता धावडे, गणेश सोळंके, माधुरी कोरडे व श्रीकांत कोरडे यांनी अभिनंदन केले आहे .