दिव्यांग सोशल फाउंडेशन तर्फे आरोग्य कार्यशाळा संपन्न..


अकोला ; स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे संपूर्ण भारतभर प्रा.विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत .दिव्यांग व सर्वसामान्यांना सुदृढ आरोग्य लाभावे यासाठी दि. 31 ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत औरंगाबाद येथील सुप्रसिद्ध फिटनेस ट्रेनर सुवर्णा शेळके यांच्या मार्गदर्शनात संस्थेतर्फे आरोग्य कार्यशाळा घेण्यात आली . अपेक्षा अपार्टमेंट क्रमांक २ ,गणेश नगर ,लहान उमरी येथील दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या कार्यालयात सदर कार्यशाळा उत्साहात पार पडली .विशेष म्हणजे अतिरिक्त वजन कमी करणे ,दिव्यांग बांधवांना व्यायाम कसा करावा ? संतुलित आहार व आरोग्य जनजागृती पर विशेष व्याख्यानातून ट्रेनर सुवर्णा शेळके यांनी मार्गदर्शन केले .ज्या दिव्यांगांना कार्यालयात येता आले नाही त्यांच्या घरी जाऊन त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना मार्गदर्शन करण्यात आले .

संस्थेतर्फे लवकरच दिव्यांग रोजगारासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार असून ज्यांना या कार्यशाळेत सहभागी व्हायचे आहे त्यांनी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चा हेल्पलाइन ०९४२३६५००९० या क्रमांकावर संपर्क साधावा .असे आवाहन प्रा.विशाल कोरडे यांनी केले आहे .आरोग्य कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा.अरविंद देव ,अनामिका देशपांडे ,श्वेता धावडे ,सुजाता नंद ,प्रमोद चव्हाळे ,स्मिता अग्रवाल ,पूजा गुंटीवार ,रोहित सूर्यवंशी ,वसुधा पंडित ,अंकुश काळमेघ व विशाल भोजने यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published.