दिव्यांग सोशल फाउंडेशन च्या साह्याने वर्ग बारावीचे अंध विद्यार्थी देत आहेत बोर्ड परीक्षा

अकोला; स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या माध्यमाने संस्थापक अध्यक्ष डॉ.विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात लुईस ब्रेल वाचक व लेखनिक बँक अकोला संपूर्ण भारतभर अंध विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी वाचक व लेखनिक पूर्वीत आहे. *दि.११फेब्रुवारी २०२५ पासून वर्ग बारावी मधील विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू झाली आहे. या परीक्षेत संपूर्ण महाराष्ट्रातून अंध विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. या अंध विद्यार्थ्यांसाठी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोलाच्या लुईस ब्रेल वाचक व लेखनिक बँकेतर्फे परीक्षा कालावधीत वाचक, लेखनिक व मदतनीस पुरवले जात आहेत*. *दि. ११ फेब्रुवारी २०२५ रोजी न्यू इंग्लिश जुनियर कॉलेज अकोला येथे २ अंध विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र असून या केंद्रावर दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे वाचक व लेखनिक पुरवले गेले*. या अंध विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी डॉ.विशाल कोरडे व दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या सदस्यांनी न्यू इंग्लिश कॉलेज अकोला येथे जाऊन त्यांना परीक्षेसंबंधी सूचना व परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. *ह्या शैक्षणिक उपक्रमात अंध विद्यार्थ्यांसाठी वाचक व लेखनिक म्हणून रोशनी पवार , समीक्षा शिरसाट , अनामिका देशपांडे , अस्मिता मिश्रा , संचिता चव्हाण , तन्वी दळवे , सिद्धार्थ ओवे , गणेश सोळंके , वैष्णवी मानकर व माधव जोशी सहकार्य करीत आहेत*. सदर शैक्षणिक उपक्रमात डॉ.विशाल कोरडे हे वर्ग बारावीच्या अंध विद्यार्थ्यांना परीक्षा कालावधीत अभ्यास कसा करायचा ? वाचक लेखनिक यांचा उपयोग करून परीक्षा कशी द्यायची ? एवढेच नव्हे तर ह्या अंध विद्यार्थ्यांना ब्रेल लिपीत व ध्वनिमुद्रित करून बोर्डाचा अभ्यासक्रम दिला जात आहे. यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रात १०० दिव्यांग बांधवांना वर्ग बारावी साठी तर वर्ग दहावीसाठी १५० दिव्यांग विद्यार्थ्यांना संस्थेतर्फे वाचक व लेखनिक पुरवले जाणार आहे. *समाजातील ज्या व्यक्तींना लुईस ब्रेल वाचक लेखनिक बँकेचे सदस्य होऊन दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी सहकार्य करायचे आहे त्यांनी संस्थेच्या ९४२३६५००९० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून नोंदणी करावी अशी माहिती आमच्या प्रतिनिधीशी बोलताना अनामिका देशपांडे यांनी दिली*. या आगळ्यावेगळ्या शैक्षणिक उपक्रमाचे शिक्षण क्षेत्रात कौतुक होत असून श्री शिवाजी महाविद्यालय अकोला चे प्राचार्य डॉ.रामेश्वर भिसे व संस्थेचे अध्यक्ष श्री.हर्षवर्धन देशमुख यांनी डॉ. विशाल कोरडे यांच्या कार्याचा गौरव केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.