
अकोला :
आक्रमण युवक संघटनेच्या वतीने रेल्वे लायब्ररी अकोला येथे एक दिवसीय जिल्हा स्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले.या शिबिराला प्रमुख प्रशिक्षक आक्रमणचे संघटन प्रमुख अँड सुनील गजभिये हे होते.हे शिबिर 11 ते 5 या वेळेत झाले कार्यकर्ता सक्षम होण्यासाठी गजभिये सरांनी मार्गदर्शन केले की भुतकाळ, वर्तमान व भविष्य या सर्वांचा विचार करुन महापुरुषांच्या विचारांचा दूर द्रुष्टी व त्यांनी या देशासाठी व समजासाठी जे कार्य केले त्यावर प्रकाश टाकून आता आपण करायचे कार्य यावर मार्गदर्शन केले.
या शिबिरात बार्शीटाकळी तालुका प्रमुख पदी जिवन सावद, तालुका उपप्रमुख गजानन इंगळे व तालुका कोषाध्यक्ष सुरेश इंगळे यांची नियुक्ती करण्यात आली. प्रास्ताविक जिल्हा अध्यक्ष सूरज मेश्राम यानी संघटनेचे कार्य व अकोला जिल्ह्यात आक्रमण ने केलेले कार्य सांगितले व संचालन जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद इंगळे यानी केले व आभार कुणाल शेंडे यांनी मानले या शिबिराला तालुक्यातून पदाधिकारी व राजेश भीमकर, सचिन तिड्के, रोशन सरदार, लक्की लांजेवार, राहुल इंगोले, निलेश इंगळे, सचिन रामटेके, सतीश शेजव, सिद्धार्थ रामटेके,सचिन भीमकर, रोशन रंगारी, रोशन चवरे प्रशांत सुखदेवे,कैलाश हिवराळे,सूरज शेगावकर, संदीप कांबळे, चेतन डोंगरे , यांनी शिबिर यस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.