स्थानिक : अकोला येथील प्रबुद्ध भारत एज्यूकेशन सोसायटी द्वारा संचालित रमाई आंबेडकर मुलींचे वसतिगृह व राजर्षी शाहू महाराज मुलांचे वसतीगृह येथे प्रतुल विरघट यांच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी वंचित बहुजन महीला आघाडीच्या प्रदेश महासचिव अरुंधती ताई शिरसाट , जिल्हाध्यक्षा व संस्थेच्या उपाध्यक्षा प्रभाताई शिरसाट, संस्थेचे सचिव तथा प्राचार्य अमोल शिरसाट सर, महानगर अध्यक्षा वंदनाताई वासनिक, प्रसिद्धी प्रमुख सुनिता ताई गजघाटे, वंचित बहुजन आघाडी प्र. प्रमुख सचिनभाऊ शिराळे, पश्चिम महानगर युवक महासचिव कुणाल भाऊ राऊत, संघटक शेखर इंगळे, महानगर पुर्व प्र. प्रमुख आकाश जंजाळ, उपाध्यक्ष आकाश गवई, वैभव खडसे, दिपक भगत, अरूण विरघट अविनाश विरघट यांच्यासह संस्थेचे कर्मचारी, पदाधिकारी, शिक्षवृंद ,विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.