“दिशा चिंतनाची” संदर्भग्रंथ प्रकाशन समारंभाचे आयोजन

अकोला , दि 4 (प्रतिनिधी )
इंजि.आनंद चक्रनारायण संपादित हरीश खंडेराव यांच्या आंबेडकरवादी साहित्य समीक्षेवरील
“दिशा चिंतनाची” संदर्भग्रंथ प्रकाशन समारंभाचे आयोजन रविवार दि 6 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 10 वाजता करण्यात आले आहे.
सदरील संदर्भग्रंथ प्रकाशन जेष्ठ आंबेडकरी साहित्यिक तथा इतिहासकार प्रा प्रकाश जंजाळ यांच्याहस्ते होणार असून अध्यक्षस्थान डॉ बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान अकोला चे अध्यक्ष प्रा मुकुंद भारसाकळे सर भूषविणार आहेत. या प्रकाशन सोहळ्याला प्रमुख उपस्थिती आयु रमेश तायडे , आयु अशोक इंगळे आदींची लाभणार आहे .
सदरील सोहळा डॉ बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान , खडकी ,राष्ट्रीय महामार्ग क्र 6 जवळ , मातोश्री रमाबाई आंबेडकर सांस्कृतीक सभागृह , अकोला येथे रविवार दिनांक 6 नोव्हेंबर 2022 रोजी
सकाळी 10 वाजता संपन्न होणार असून जास्तीत जास्त संख्येने या प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन सम्राट विचार मंच औरंगाबाद आणी प्रज्ञा प्रकाशन मुंबई यांनी केले आहे ….

Leave a Reply

Your email address will not be published.