
स्थानिक:अकोला अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जिल्हा अकोल्याच्या वतीने अकोला जिल्हा महिला अध्यक्षा सौ. मायाताई ईरतकर यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्र तपासणी शिबिर व अस्थिरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ,
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ माजी नगरसेविका श्रीमती सुमित्रा ताई निखाडे कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संगीताताई आढाऊ , कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले मा. आ .बळीराम सिरस्कार, प्रा .डॉ. संतोष हुशे, प्रा शेळके सर, श्री उमेश मसने, डॉ. विक्रांत इंगळे, डॉ. निलेश वानखडे,माजी नगरसेविका वर्षाताई बगाडे, प्रा. कांबळे सर, डॉ. उमेश वानखडे माजी जी. प .सदस्य डॉ. अशोक गाडगे ,रामदासजी खंडारे, बाळकृष्ण काळपांडे, रमेश बोळे ,ज्योती निखाडे , ज्योती भवाने ,डॉ. नंदरघणे , अवचार ताई , संध्या बोळे शारदा धानोकर इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती डॉ.निलेश वानखडे व डॉ. विक्रांत इंगळे यांनी असंख्य रुग्णांची तपासणी करून आपली सेवा दिली यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सेवेचा लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समता परिषदेच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.