
अकोला: स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे प्रा.विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात विविध सामाजिक उपक्रम संपूर्ण भारतभर राबवले जात आहेत . गरजू दिव्यांग बांधवांना व्हीलचेअर , पांढरी काठी , ब्रेल बुक्स व शैक्षणिक शिष्यवृत्ती संस्थेतर्फे दिली जात आहे .याच उपक्रमा अंतर्गत दि.२४ जून २०२३ रोजी माहेश्वरी भवन येथे दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला , रोटरी क्लब अकोला ईस्ट व गुजरातअंबुजा एक्स्पोर्टस लिमिटेड च्या संयुक्त विद्यमाने गरजू दिव्यांगांना व्हीलचेअर चे वितरण करण्यात आले . यावेळी मंचावर दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे संस्थापक अध्यक्ष प्रा.विशाल कोरडे, गुजरात अंबुजा एक्सपोर्टस लिमिटेड चे ब्रिजमोहन चितलांगे ,बुलढाणा अर्बन बँकचे राधेश्यामजी चांडक ,राजे संग्रामसिंह भोसले,रोटरी क्लब अकोला ईस्ट चे ओंकार गांगडे,मोहित भाला , संजय पिंपरकर, वैजनाथ कोरकाने , सुनील नवघरे व अजय सेंगर उपस्थित होते .

सदर कार्यक्रमात पारडी ताडचे गोपाल लांभाडे , अकोल्याच्या सूर्यकांता वारोकार व जेलाराम ट्रस्ट च्या ऑर्थोपेडिक ग्रंथालयाला व्हीलचेअर चे वितरण करण्यात आले . ज्या गरजू दिव्यांगांना व्हीलचेयर , ब्रेल बुक्स , व्हाईट केन व शैक्षणिक शिष्यवृत्ती हवी आहे त्यांनी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या ०९४२३६५००९० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा असे आव्हान संस्थेचे कोषाध्यक्ष श्री.विजय कोरडे यांनी केले . कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेच्या भारती शेंडे ,विजयकुमार वनवे ,संजय फोकमारे ,राजू डांगे ,दीपक खरात ,पूजा गुंटीवार नेहा पलन ,अनामिका देशपांडे ,विजयकुमार राऊत व रोटरी क्लब अकोला ईस्ट च्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले .
