‘गझलकार’ सीमोल्लंघन २०२३ हा ऑनलाइन मराठी गझल वार्षिकांक
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य,ज्येष्ठ मराठी-उर्दू गझलकार डॉ. दिलीप पांढरपट्टे IAS यांच्या शुभ हस्ते दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रकाशित झाला.
मराठी रसिकांना मराठी गझलने चांगलेच वेड लावले आहे.मराठी गझलच्या कला आणि कौशल्यासंबंधी सबकुछ देणाऱ्या, ख्यातनाम गझलकार श्रीकृष्ण राऊत यांच्या ‘गझलकार’ या
मराठी गझलच्या ब्लॉगचा ‘गझलकार’ सीमोल्लंघन हा वार्षिकांक दरवर्षी दसऱ्याच्या निमित्ताने मागील पंधरा वर्षांपासून ऑनलाइन प्रकाशित होत आहे.
यंदा ह्या अंकात महाराष्ट्रभरातील १९० मराठी गझलकारांच्या ५५० हून अधिक गझला तसेच मराठी गझल संदर्भातील महत्त्वाचे लेख, गझलसंग्रहाची परीक्षणे समाविष्ट आहेत.
ह्या विशेषांकाचे सल्लागार संपादक पुणे येथील सुरेश भट गझलमंचचे अध्यक्ष शाहीर सुरेशकुमार वैराळकर आहेत.
चोखंदळ संपादनाची धुरा ख्यातनाम ज्येष्ठ गझलकार श्रीकृष्ण राऊत यांनी सांभाळली असून
युवा गझलकार अमोल शिरसाट,विनोद देवरकर हे या अंकाचे सहसंपादक आहेत.अंकाचे उत्तम मुद्रितशोधन बाळू घेवारे यांनी केले आहे. सालाबादप्रमाणे याही वर्षी या डिजिटल अंकाला जगभरातल्या मराठी गझल रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळतो आहे.
वाचकांसाठी अंक पुढील लिंकवर विनामूल्य उपलब्ध आहे.