
नांदुरा ( दि. २५ फेब्रु;२५)- स्थानिक श्री पुंडलिक महाराज महाविद्यालय, नांदुरा रेल्वे. जि. बुलढाणा. द्वारा आयोजीत दत्तकग्राम रसूलपुर (कोळंबा ) येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रम-संस्कार शिबीरामध्ये ‘आर्थिक साक्षरता व डिजीटल आर्थीक व्यवहार’ या विषयावर प्रमुख वक्ते म्हणुन बोलतांना वाणिज्य विभाग प्रमुख प्रा राहुल माहुरे यांनी वरील प्रतीपादन केले.
पुढे बोलताना म्हणाले की, आर्थिक साक्षरता लोकांमध्ये अनुशासन आणि क्षमता विकसित करते. यामुळे नियमित बचत आणि गुंतवणूक, चांगले कर्ज व्यवस्थापन याची सवय लागते. जीवनातील उद्दिष्टे गाठता येतात. जीवनशैलीतील सुधारणा होते. तसेचं आर्थिक साक्षरता व्यक्तींना आर्थिक फसवणूकीपासून सावधान करते.जनतेचे आर्थिक कल्याण साध्य होते. त्यामुळे डिजिटल आर्थिक साक्षरता महत्वाची आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॅा सुचीता दिघे होत्या तर याप्रसंगी विचारपिठावर डॅा. शांताराम भोये, डॅा. अमोल निप्टे, डॅा. निखिलेश धुर्वे, डॅा. सुनिता देकाटे उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात डॅा सुचीता दिघे यांनी विद्यार्थ्यांना तणाव मुक्त जीवन कसे जगावे याची सविस्तर माहीती दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॅा सुनिता देकाटे यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. गायत्री झांबरे हिने तर आभार प्रदर्शन कु. प्राची सुमरे हिने केले.
याप्रसंगी सर्व शिबीरार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.