अकोट :
श्रध्देय ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अकोट तालुक्यातील अकोलखेड येथील कॉंग्रेसचे पंचायत समितीचे उमेदवार ज्यांना जनतेने भरगच्च मतदान केले व विजयाच्या बरोबरीत आणले परंतु ईश्वर चिट्टीने त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले असे कलाल समाजाचे नेते दिगंबर संपतराव पिंप्राळे यांनी वंचित बहुजन आघाडीत पक्ष कार्यालय अकोला येथे जाहिर प्रवेश केला.
प्रवेशाच्या वेळी वंचित बहुजन आघाडीचे पश्चिम विदर्भ महासचिव बालमुकुंद भिरड, जिल्हाध्यक्ष प्रमोदभाऊ देंडवे, जिल्हा महासचिव मिलिंदभाऊ इंगळे, ॲड.संतोष राहाटे, अकोट तालुकाध्यक्ष चरण इंगळे, दिपक गवई, शरद इंगोले, विकास सदांशिव, गजानन दांडगे, प्रदिप शिरसाट, मोहन तायडे, गजानन तायडे, भिमराव पळसपगार, स्वप्निल सरकटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.