डायल 112 वर फेक कॉल कराल तर खबरदार; दाखल होईल आता गुन्हा!

पोलीस स्टेशन खदान, हद्दीत दि.२९.०४.२०२४ रोजी सिंधी कॅम्प, अकोला या ठिकाणी फिर्यादी पोलीस अंमलदार देवेंद्र श्रीकृष्ण चव्हाण ब.नं. १९१३ वय ४० नेमणुक पो.स्टे. खदान, अकोला हे त्यांचे सोबत कर्तव्यावर असलेले पो. अंमलदार गजानन अंभारे ब.नं. ६३३ नेमणुक पो.स्टे. खदान बिट मार्शल क.०१ वर कर्तव्यावर होते. डायल क ११२ वर रात्री ०१/३७ वा मो.क. ८७९३३१२७७२ वरून कॉलर देवराव साठे याने मोबाईलने फोन करून माहिती दिली कि त्यांनी ०९ ईसमांसोबत मिळुन खाजा अजमेरी उर्दू हायस्कुल सिंधी कॅम्प, अकोला येथे बायकोचे खुन केले आहे. फिर्यादी पोलीस अंमलदार देवेंद्र श्रीकृष्ण चव्हाण ब.नं. १९१३ यांना एमडिटी वर माहिती मिळाल्यावरून त्यांचे सहकारी सोबत घटनास्थळी जावुन कॉलर ला भेटुन विचारपुस केली असता त्याने उडवाउडविचे असमाधानकारक उत्तर देत होता सदर ठिकाणी पाहणी केली असता असा कोणताही प्रकार घडला असल्याचे दिसुन आले नाही. आरोपी नामे देवराव साठे रा. सिंधी कॅम्प, खदान, अकोला याने पोलीसांनी शासकीय कर्तव्य करीत असतांना मोबाईल क ८७९३३१२७७२ वरून दि.२९/०४/२०२४ चे रात्री ०१.३७ वा डायल ११२ वर कॉल करून त्रास देण्याचे उद्घाने खाजा अजमेरी उर्द हायस्कुल, अकोला येथे बायकोचा खुन केला आहे अशी तिन वेळा खोटी माहिती दिल्याने त्यांचे विरूध्द पो.स्टे. खदान अदखलपात्र अप क. ०५७१/२०२४ कलम १८२ भारतीय दंड संहिता प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डायल ११२ हे सामान्य नागरीकांना तात्काळ मदत मिळणे करीता महाराष्ट्र पोलीस मार्फत दिलेली सुविधा आहे. डायल ११२ वर पोलीसांना त्रास देण्याचे उद्देशाने खोटी माहिती देवुन दिशाभुल केल्यास महाराष्ट्र पोलीस कडुन कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे.

<

Leave a Reply

Your email address will not be published.