स्थानिक : अकोला जिल्ह्यातील तेल्हारा आणि अकोट तालुक्यातील ४० गावे मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचे सुजात आंबेडकर यांच्या तीन दिवसीय दौ-यात निष्पन्न झाले होते, त्यावर जिल्हा परिषद मार्फत तातडीने विकास कामे मार्गी लागावेत ह्याचा पाठ पुरावा करून आदिवासी भागात विकास कामे सुरू करण्यात आली.
सुजात आंबेडकर ह्यांनी विविध पाड्यावर भर पावसात जावून भूमिपूजने केली. पक्षाच्या जिल्हा परिषद सदस्या प्रमोदीनीताई कोल्हे ह्यांचे मतदार संघात ही कामे सुरू झाली. त्यामध्ये उमरशेवडी ते तलाई २५ लाखाचा रस्ता, तलाई येथे घरोघर नळाद्वारे पाणीपुरवठा योजना ८.५० लक्ष रुपये, उमरशेवडी येथे नवीन अंगणवाडी बांधकाम ११ लक्ष, झरी बाजार येथे स्मशानभूमी शेड बांधकाम ५ लक्ष रुपये,
तलाई येथे स्मशानभूमी शेड बांधकाम ५ लक्ष रुपये, चिपी येथे बोअरवेल व पाणीपुरवठा योजना ८ लक्ष रुपये, गायरान येथे बोरवेल करणे ३ लक्ष रुपये, नवी तलाई येथे पाणीपुरवठा योजना व नळ कनेक्शनसह देणे ६.५० लक्ष, नवी तलाई येथे स्मशान भूमी कडे जाणारा रस्ता बांधकाम करणे ५ लक्ष अशी कामे पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात आली.
ह्याच भागास जोडणारा २.५ कोटीचा रस्ता देखील मंजूर करण्यात आला असून तो दिवाळीत सुरू करण्यात येणार आहे.
अश्या रितीने दुर्गम आदिवासी भागात मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी सुजात आंबेडकर आणि युवा आघाडीचे पदाधिकारी ह्यांनी पाठपुरावा केला.