
लखन इंगळे व मित्र मंडळी यांनी वारंवार पाठपुरावा केल्यामुळे मा.आमदार यांनी सभागृहासाठी दिला 20 लाख रुपये निधी
स्थानिक: अकोट येथील गोरगरीब व सामान्य लोकांसाठी नेहमी सक्रिय असलेले सर्वांचे परिचित आंदोलन कर्ते लखन इंगळे शहर उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी आकोट यांनी दिनांक 11 फेब्रुवारी 2021 रोजी तत्कालीन मा.पालकमंत्री अकोला मा.जिल्हाधिकारी अकोला मा.आमदार प्रकाश भारसाकळे आकोट विधानसभा मा.अध्यक्ष न.प.आकोट यांना निवेदन दिले असता आमदार यांनी घेतली निवेदनाची दखल निवेदन मध्ये विविध मागण्यापैकी प्रभाग 4 मधली अनु.क्र.16 ची मागणी सिद्धार्थ नगर आंबोडीवेस येथे बुद्ध मूर्ती समोर सामाजिक सभागृह बांधकाम करीता निधी देण्यासाठी मा.आमदार प्रकाश भारसाकळे व नगर परिषद अध्यक्ष यांना निवेदन देऊन भेटले असता वंचित चे लखन इंगळे व सोबत असलेले विक्की तेलगोटे, नितीन तेलगोटे, प्रतीक तेलगोटे, नवनीत तेलगोटे व इतर नागरिक यांच्या सह्या घेऊन निवेदन दिले असता त्यांच्या मागणीला मा. आमदार प्रकाश भारसाकडे यांनी जिल्हा नियोजन समिती मध्ये मंजुरात घेऊन आमदार निधीतून विस लाख रुपयाचे सामाजिक सभागृहासाठी निधीला मंजुरात दिली आहे. लखन इंगळे व त्यांचे सोबत असलेले मित्र यांनी निवेदन देऊन वारंवार पाठपुरावा केल्यामुळे या मागणीला यश आले आहे व या कामाला काही दिवसातच सुरवात होणार आहे करीता मा.आमदार प्रकाश भारसाकळे यांचे आभार लखन इंगळे व मित्र मंडळी यांनी मानले.